Yogesh Kadam sakal
महाराष्ट्र बातम्या

Yogesh Kadam Reaction : “छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही” ; मंत्री योगेश कदमांचं विरोधकांना प्रत्युत्तर!

Minister Yogesh Kadam responds to opposition criticism : सचिन घायवळ याला शस्त्र परवाना प्रकरणात मुख्यमंत्र्यांकडून क्लीनचीट मिळाल्यानंतर केली भली मोठी पोस्ट, जाणून घ्या नेमकं काय म्हटलं आहे?

Mayur Ratnaparkhe

Minister Yogesh Kadam’s Response to Opposition Allegations: पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यास मंजुरी दिल्यावरून, राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर मागील दोन दिवसांपासून जोरदार टीका सुरू होती. विरोधकांनीही हा मुद्दा उचलून धरत योगेश कदम यांच्या राजीनाम्याची थेट मागणी केली होती, त्यामुळे राजकीय वातावरण तापू लागलं होतं. 

मात्र या प्रकरणी आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्याची पाठराखण केली होती, त्यानंतर आज खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत भूमिका स्पष्ट केली आणि एकप्रकारे मंत्री योगेश कदम यांना जाहीरपणे क्लीनचीटच दिली. त्यामुळे योगेश कदम यांनाही मोठा धीर आल्याचे दिसत आहे. कारण, मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी भूमिका स्पष्ट केल्यानंतर, योगेश कदम यांनी एक भलीमोठी फेसबुक पोस्ट टाकून विरोधकांवर निशाणा साधत प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले? –

“याबद्दल एक सुनावणी गृह राज्यमंत्र्यांनी घेतली होती. पण शस्त्र परवाना दिलाच गेला नाही. पोलीस आयुक्तांनी वस्तूस्थिती लक्षात आणून दिली. त्यामुळे परवाना दिला गेला नाही. परवाना दिला असता तर अशाप्रकारचा आरोप योग्य होता. पण परवाना दिलेला नाही.” असं मुख्यमंत्री फडणीस म्हणाले आहेत.

मंत्री योगेश कदम यांनी नेमकं काय म्हटलंय? -

‘’२०१९ पासून माझी राजकीय कारकीर्द संपुष्टात आणण्याचा प्रयत्न काहीजण करत आले. तरीसुद्धा सच्च्या शिवसैनिकांच्या जोरावर मी निवडून आलो. सत्तेतला आमदार म्हणून जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून वाढल्या, परंतु तेव्हादेखील ज्या विरोधकाला आम्ही पराभूत केलं, त्यालाच ताकद देण्याचं काम काहीजणांनी केलं. स्वतःच्या पक्षातील आमदाराला संपवण्याचा प्रयत्न काहीजण तेव्हापासूनच करत होते.’’

‘’पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत माझ्या कुटुंबियांचा स्वतःच्या वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी वापर करून घेण्याइतपत राजकारणाची पातळी घसरली गेली. मला पराभूत करण्यासाठी त्यांनी समाज, पैसा आणि जातीच्या आधारावर गलिच्छ राजकारण करण्याचे अनेक प्रकार केले. माझी वैयक्तिक बदनामी करण्याच्या हेतूने माझ्या खाजगी आयुष्यातदेखील ढवळाढवळ करण्याचा काहीजणांनी प्रयत्न केला. तरीदेखील, दुसऱ्यांदा जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले.’’

 ‘’माझ्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवत मला मंत्रीपद दिले. साहजिकच, ज्यांना मला आमदार म्हणून पाहण्याचीही इच्छा नव्हती, त्यांना मी मंत्री झालो हे कसं बघवणार! गेल्या सहा वर्षांपासून लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना आजवर माझ्यावर कोणीही गुंड किंवा भ्रष्ट प्रवृत्तीचे समर्थन केल्याचे आरोप देखील करू शकले नाहीत. तरीसुद्धा काही ठराविक मंडळी माझी इमेज डॅमेज होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत. दुसऱ्याची प्रतिमा मलिन करण्याच्या नादात, राजकारणात सक्रिय नसलेल्या माझ्या आईलादेखील या राजकारणात ओढून नीचपणाचा कळस गाठला गेला.’’

‘’व्यक्तीबद्दल मनात असलेला द्वेष काहीजणांना राजकारणात इतक्या खालच्या पातळीवर घेऊन येईल, अशी कल्पनादेखील केली नव्हती. असो, राजकारणात सर्वच गोष्टींचा ‘सामना’ करावा लागतोच. पण अशा राजकारणामुळे मी आजवर कधीच विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही. मी माझं काम, माझी जबाबदारी आणि माझं कर्तव्य प्रामाणिकपणे निभावत आहे आणि पुढेही तसंच निभावत राहणार आहे. शेवटी असंच म्हणावं वाटतं की, “छोटी मोठी वादळं उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही.’’ असं योगेश कदम यांनी आपल्या एक्स वरील पोस्टमध्ये म्हटलय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akhilesh Yadav Facebook Account Ban : सपा प्रमुख अखिलेश यादव यांचे फेसबुक अकाउंट बंद; तांत्रिक चूक की आणखी काही?

गुंड निलेश घायवळ प्रकरणात मोठी बातमी! जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहाराची ४० प्रकरणे समोर, तपास सुरू

Duplicate Currency : कोल्हापूरात बनावट नोटा बनवणारी टोळी उघडकीस; एक कोटी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, टोळीचा मास्टर माईंड कोल्हापूर पोलिस दलातील कर्मचारी

Jaykumar Gore : बार्शीच्या राऊतांचा पराभव एक अपघात होता; तालुक्याच्या विकासाचा वेग खंडित झाला

Uttar Pradesh Tourism : गोव्यासारखा सुट्टीचा आनंद लुटा युपीमध्ये; यमुना नदीच्या पवित्र पाण्यात मिळवा बोटींगचा आनंद!

SCROLL FOR NEXT