Youth Congress Election  esakal
महाराष्ट्र बातम्या

Youth Congress प्रदेशाध्यक्षपदासाठी दिग्गजांचे सुपुत्र मैदानात

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जवळचे शिवराज मोरे मैदानात उतरले आहेत. ते सध्या युवकचे उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत.

सयाजी शेळके

उस्मानाबाद : युवक काँग्रेसच्या (Yuvak Congress) पक्षाअंतर्गत निवडणुकीची धामधुम सुरू झाली आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी मराठवाड्यातून (Marathwada) दोन उमेदवार आपले भवितव्य अजमावत आहेत. तर त्यांना सांगली, पुणे, अहमदनगर जिल्ह्यातून तगडे आवाहन मिळत आहे. काँग्रेस पक्षाच्या (Congress Party) पक्षाअंतर्गत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. कोरोनाच्या काळात दूरावलेल्या कार्यकर्त्यांना पुन्हा आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न युवक नेत्यांकडून केला जात आहे. संपर्क वाढवून मतदान आपल्या पारड्यात घेण्यासाठी पळापळ सुरू केली आहे. युवक प्रदेशाध्यक्ष पदासाठी यंदाही मोठी चुरस असणार आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या जवळचे शिवराज मोरे मैदानात उतरले आहेत. ते सध्या युवकचे उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. त्यांनीही कार्यकर्त्यांमध्ये जाऊन तयारी सुरू केली आहे. या शिवाय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे चिरंजीव कुणाल राऊत यांनीही दंड थोपटले आहेत. विदर्भातून त्यांना सहकार्य मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे. तर महिलांमधून कल्याणी वडेट्टीवार यांनीही आपले भवितव्य अजमावण्याचा प्रयत्न केला आहे. तर अब्दुल अमेर सालीम यांनी औरंगाबाद येथून उमेदवारी दाखल केली आहे. याशिवाय विद्यामान प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे कोणाच्या पारड्यात वजन टाकतात यावरूनही प्रदेशाध्यक्ष पदाचा निर्णय अपेक्षित आहे.

विजयसिंह चौधरी पुण्यात मैदानात उतरले आहेत. ते विश्वजीत कदम यांचा पाठिंबा मिळविण्यात किती यशस्वी होतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर विश्वजीत कदम हे कोणाच्या डोक्यावर हात ठेवतात. यावरून नुतन अध्यक्ष निश्चित होईल, अशी पक्षाच्या युवक कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होत आहे. तर अनिकेत म्हात्रे (मुंबई) हे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी एकूण १५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. यामध्ये अनिकेत म्हात्रे (मुंबई), मनोज कायंदे, प्रशांत ओगले, तन्वीर अहमद कुरेशी, आकाश गुजर, निखील कांबळे हे पुरुष उमेदवार असून रेखा पवार, सोनालक्ष्मी घाग, कल्याणी रांगोळे, शिवाणी वडेट्टीवार या महिला उमेदवार आहेत.

मरावाड्यातून दोन उमेदवार

मराठवाड्यातून औरंगाबादचे अब्दुल अमेर सालीम यांची उमेदवारी आहे. तर दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील शरण पाटील हेही प्रदेशाध्यक्ष पदासाठी आपले भवितव्य अजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेस पक्षाचे विद्यमान कार्याध्यक्ष बसवराज पाटील याचे ते चिरंजीव आहेत. त्यामुळे आता जिल्ह्याचे नावही राज्याच्या यादीत झळकले आहे. १२ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर निवडणुकीचा (मतदानाचाही) कार्यकाळ असणार आहे. तर प्रत्येक मतदान करणाऱ्या सदस्याने ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याला तात्काळ (ऑनलाईन) मतदान करता येणार आहे.

उस्मानाबाद जिल्हाध्यक्षासाठी चुरस

जिल्हाध्यक्षपदासाठी चंद्रशेखर पवार, श्रीनिवास पाटील, अवधूत क्षीरसागर, आण्णासाहेब महानोर, कन्हैया कडगंचे, रुपाली माटे यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस आहे. जास्तीची मते मिळणाऱ्यास अध्यक्षपद, त्यापेक्षा कमी मिळालेल्याला उपाध्यक्ष अशी विभागणी केली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT