State Election Commission

 

esakal

महाराष्ट्र बातम्या

ZP and Panchayat Elections 2026: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी खर्च मर्यादा किती असणार? निवडणूक आयोगाने केलं जाहीर

Expenditure Limit for Zilla Parishad and Panchayat Elections : राज्य निवडणूक आयोगाकडून १२ जिल्हापरिषद आणि १२५ पंचायत समितीसाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.

Mayur Ratnaparkhe

Zilla Parishad and Panchayat Elections Expense Limit राज्य निवडणूक आयोगाकडून आज(मंगळवार)१२  जिल्हापरिषद आणि १२५ पंचायत समितीसाठी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली. यानुसार मतदान ५ फेब्रवारी रोजी आणि निकाल ७ फेब्रुवारी रोजी असणार आहे. तर यावेळी निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीसाठीची खर्च मर्यादा देखील जाहीर करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या पत्रकारपरिषदेत याबाबत माहिती देताना सांगण्यात आले की, या निवडणुकीत निवडणूक खर्चावर जी मर्यादा आहे. त्याचे तीन स्लॅब करण्यात आले आहेत. ज्या जिल्हापरिषदेत ७१ ते ७५ निवडणूक विभाग आहेत, त्यामध्ये जिल्हापरिषदेसाठी नऊ लाख, पंचायत समितीसाठी सहा लाख. ज्या जिल्हापरिषदमध्ये ६१ ते ७० निवडणूक विभाग आहेत, त्यामध्ये जिल्हापरिषदसाठी साडेसात लाक आणि पंचायत समितीसाठी ५.२५ लाख. ज्या जिल्हापरिषदमध्ये ५० ते ६० निवडणूक विभाग आहेत, त्या जिल्हापरिषदसाठी सहा लाख आणि पंचायत समितीसाठी साडेचार लाख. अशाप्रकारे निवडणूक खर्चाची मर्यादा आहे.

या निवडणुकीत एकूण मतदान केंद्र हे २५ हजार ४८२ आहेत. एकूण मतदार २.०९ कोटी आहेत. ज्या जागांसाठी निवडणूक घ्यायची आहे, त्यामध्ये १२ जिल्हापरिषदेत एकूण ७३१ निवडणूक विभाग आहेत. म्हणजेच ७३१ जिल्हापरिषद सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यामध्ये महिलांसाठी ३६९ जागा आहेत. अनुसूचित जाती साठी ८३, अनुसूचित जमाती २५, नागरिकांचा मागासप्रवर्ग १९१ जागा आहेत.

ज्या पंचायतसमिती जागांसाठी ही निवडणूक आहे, त्या एकूण पंचायत समिती १२५ आहेत आणि एकूण पंचायत समिती सदस्य १ हजार ४६२ निवडून द्यायचे आहेत. महिलासांठी - ७३१, अनुसूचित जाती- १६६, अनुसूचित जमाती- ३८ आणि नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी – ३४२ जागा आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Mayor Salary : देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबईच्या महापौरांना किती मिळतो पगार?

Devendra Fadnavis : "खिशात नाही आणा अन बाजीराव म्हणा"; देवेंद्र फडणवीसांचा अजित पवारांना खोचक टोला!

विदर्भात काळीज पिळवटणारी घटना! कडाक्याच्या थंडीत काळ्या बॅगमध्ये आढळली ८ दिवसांची चिमुकली, आई वडिलांचा शोध सुरु

Video: मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांने इतका जोरात सिक्स मारला की CSK च्या फॅनच्या गालाला झालं फ्रॅक्चर

Latest Marathi News Live Update : रॅलीत झेंडा विजेच्या तारेस लागून स्फोट, कार्यकर्ता गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT