22-Year-Old Choreographer Jainil Mehta Goes Viral for Dancing in Skirts instagram
मनोरंजन

काय आहे प्रसिद्ध घागरा बॉय जयनील मेहताची स्टोरी? लोक आधी म्हणायचे 'गे'

सोशल मीडियावर जयनीलच्या व्हिडीओना तुफान पसंती मिळते अन् ते व्हायरल होताना दिसतात.

प्रणाली मोरे

सोशल मीडियावर आजकाल प्रत्येकाला डान्स व्हिडीओज(Dance Video) बनवून पोस्ट करायचे असतात आणि प्रसिद्ध व्हायचे असते. पण सर्वांनाच ती प्रसिद्धि मिळते असं नाही. अशीच एक व्यक्ती आहे की ज्याला आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी यूएसला शिफ्ट व्हावं लागलं. आपण बोलत आहोत जयनील मेहता(Jainil Mehta),ज्याची नृत्य ही केवळ आवड नाही तर पॅशन देखील आहे.(22-Year-Old Choreographer Jainil Mehta Goes Viral for Dancing in Skirts)

जयनील २२ वर्षांचा आहे,आणि त्याला घागरा घालणं खूप आवडतं. कोरिओग्राफर असलेल्या जयनीलनं #meninskirts या मोहिमेची सुरुवात केली आहे. ज्यामुळे घागरा पुरुषही घालू शकतील,आणि त्यांना यावरनं टोमणे ऐकावे लागणार नाहीत. लहानपणी जयनील आपल्या आईचा घागरा घालून घरातील खोलीत डान्स करायचा. तो म्हणाला,''गेल्या वर्षी मी एक व्हिडीओ शूट केला होता. ज्यामध्ये मी आणि माझ्या एका फ्रेन्डने घागरा घालून डान्स केला होता. तो व्हिडिओ राधा-कृष्णाच्या गाण्यावर आधारित होता,ज्यामध्ये समानता दाखवली होती कोणताही दुजाभाव नव्हता''. जयनील म्हणतो मला घागरा घालणं खूप आवडतं कारण यामुळे तुमचा डान्स अधिक ग्रेसफूल वाटतो. जयनील घागरा घालत असल्यामुळे त्याला नेहमीच लोकांचे टोमणे ऐकायला लागायचे. कोणी विचारायचं,तू गे आहेस का? कोणी विचारायचं,बायसेक्शुअल आहेस का? पण हळूहळू माझी प्रशंसा देखील लोक करू लागले. लोकांनी माझी आवड पाहिली आणि ते मग माझ्या डान्सला दाद देऊ लागले''.

जयनील पाच वर्षांचा असल्यापासून डान्स करतोय. त्याच्या आजोबांना आणि त्याला 'हम साथ साथ है' सिनेमातील 'मैय्या यशोदा' गाणं खूप आवडतं. लहानपणी जयनील या गाण्यावर खूप डान्स करायचा. आणि इथूनच त्याला डान्स करण्याचं वेड लागलं. डान्स त्याची पॅशन बनलं. तो न्यूयॉर्कमध्ये आपली स्वतःची डान्स अकादमी देखील चालवतो. जयनीलला काही बॉलीवूड स्टार्सनी देखील पाठिंबा दिला आहे. जयनीलची इच्छा आहे, भारतात स्त्री-पुरुष समानतेवर मोहिम राबवण्याची. कारण 'हे काम स्त्रीच करेल,हे पुरुषच' ही भूमिका त्याला पटत नाही.

जयनीलने कितीतरी बॉलीवूड गाण्यांवर परफॉर्म केलं आहे. आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमातील गाण्यावर डान्स करताना जयनील न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर दिसला होता. जयनीलचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. लोकांना त्याचा डान्स भलताच पसंत आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Volvo Bus: एसटीचा प्रवास आता ‘व्होल्वो’मय! २०० एसी बस ताफ्यात येणार; शयनयान बससह मोबाइलवरून तिकीट बुकिंग

Devgad Fishermen Crisis : जिल्ह्यात मच्छीमारांवरही मंदीचे सावट उलाढालीची चिंता; मासळी घटल्याने इंधन खर्च पाण्यात

Madhya Pradesh: ७,४०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप

Marathi News Live Updates : दिल्ली उच्च न्यायालयात सात न्यायिक अधिकाऱ्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती; मुख्य न्यायाधीशांसमोर शपथ

Jharkhand Plans ₹900 Crore Ayush Hospital: केरळपेक्षा स्वस्त अन् सर्वसामान्यांना परवडणारे आयुष मॉडेल; ९०० कोटींच्या हॉस्पिटलची घोषणा

SCROLL FOR NEXT