Ranbir Kapoor and Alia Bhatt Marriage Updates | Neetu Kapoor Shares Her Marriage Pic  google
मनोरंजन

आली समीप लग्नघटिका; नीतू कपूर यांनी खास फोटो शेअर करीत जागवल्या आठवणी

नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोशी चाहत्यांनी थेट रणबीर-आलियाच्या लग्नाचा संबंध जोडला आहे.

प्रणाली मोरे

रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) यांच्या लग्नावरनं इतक्या उलट-सुलट बातम्या चहूबाजूला पसरलेल्या असताना अद्याप कपूर कुटुंबानं मात्र चुप्पी साधली आहे. भट्ट कुटुंबाकडून लोकांना संभ्रमित टाकणारी विधानं समोर येत आहेत त्यामुळे चाहत्यांचा गोंधळ उडालाय. नीतू कपूर(Neetu Kapoor) यांना तर मीडिया शूटिंगच्या सेटवर प्रश्न विचारुन भंडावून सोडताना दिसतेय. पण त्या देखील चाणाक्षपणे त्या प्रश्नांना परतवून लावताना दिसत आहेत. त्यांनी जणू आपले ओठ शिवलेयत की काय असं उगाचच वाटून राहिलंय बापड्या चाहत्यांना. त्यात आता नीतू कपूर यांनी ऋषी कपूर(Rishi Kapoor) यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केलाय त्यामुळे चाहत्यांना वाटतंय की त्यांनी रणबीर-आलियाच्या लग्नाची हिंट तर दिली नाही ना. कोणता फोटो नीतू कपूर यांनी ऋषी कपूर यांच्यासोबतचा शेअर केलाय ज्यावरुन रणबीर-आलियाच्या लग्नाचा अंदाज लावला जातोय बरं. चला जाणून घेऊया सविस्तर.

नीतू कपूर यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ऋषी कपूर यांच्या सोबतच्या एका गोड आठवणीचा फोटो शेअर केला आहे. आणि तो देखील एका खास दिवसाच्या निमित्ताने. आजच्याच तारखेला, पण १३ एप्रिल १९७९ साली ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा साखरपुडा झाला होता. त्या सोहळ्याचा फोटो त्यांनी शेअर केला आहे. नीतू कपूर यांनी तो फोटो शेअर करत लिहिलं आहे,''आज बैसाखीच्या दिवशीची माझ्या आयुष्यातील गोड आठवण''. या फोटोत ऋषी कपूर सूटा-बूटात दिसत आहेत. त्यांच्या गळ्यात पुष्पहार आहे. आणि ते मोठ्या प्रेमाने नीतू कपूर यांच्या बोटात अंगठी घालत आहेत. अर्थात त्या दोघांच्या साखरपुड्यामधला तो खास क्षण कॅमेऱ्यात सुरेख टिपला गेलाय. भोवताली त्यांचे कुटुंबियही या आनंदात सामिल झालेले दिसत आहेत.

या नीतू कपूर यांच्या फोटो पोस्टवर चाहत्यांपासून त्यांच्या मुलीपर्यंत अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. रिद्धिमा कपूरनं आईच्या या पोस्टवर खूप सारे हार्ट इमोजी पोस्ट केलेयत. एक चाहता म्हणालाय,'खूप गोड आठवण, आम्ही चिंटूजींना मिस करतोयट. तर दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं,'आठवणीत रमवणारा क्षण'. काही चाहत्यांनी तर नीतू कपूर यांच्या या फोटोपोस्टचा संबंध थेट आलिया-रणबीरच्या लग्नाशीच लावला आहे. ते म्हणालेयत, 'याचदिवशी आमचे लाडके रणबीर-आलिया देखील एकमेकांसोबत गोड बंधनात अडकतील. अभिनंदन नीतूजी'.

सध्या रणबीरच्या बान्द्रा येथील घराजवळ कडक सुरक्षा तैनात असलेली दिसून येतेय. त्याची इमारत रोषणाईनं झगमगतेय आणि फुलांनी सजलेली दिसतेय. यावरनं अंदाज लावले जातायत,रणबीरच्या याच वास्तु इमारतीत त्याचं आलियासोबत लग्न होणार आहे. आलियाचा सावत्र भाऊ राहुल भट्टनं हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार,रणबीर-आलिया याच आठवड्यात लग्न करत आहेत,आणि लग्न पुढे ढकललं गेलं नाही. मी बोललेल्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. मी लग्नाची तारीख कोणालाच सांगितलेली नाही. आता फक्त ते दोघे जेव्हा अधिकृतरित्या त्यांच्या लग्नाची घोषणा करतील तेव्हा सर्वांना कळेलच. मी फक्त एवढंच सांगतेन ते २० एप्रिल पूर्वी नक्कीच होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT