shiv jayanti, veer murarbaji
shiv jayanti, veer murarbaji SAKAL
मनोरंजन

Shiv Jayanti: ऐतिहासिक पटात काम करायचंय? शिवजयंती निमित्त 'वीर मुरारबाजी' सिनेमाची अनोखी संधी

Devendra Jadhav

Veer Murarbaji Movie News: आज शिवजयंती निमित्ताने ठिकठिकाणी शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव सुरू आहे. महाराष्ट्रच नव्हे तर देशातील तमाम जनता आज शिवजयंतीचा उत्सव धुमधडाक्यात साजरा करत आहेत.

अशातच शिवजयंती निमित्त आगामी वीर मुरारबाजी सिनेमातील टीमने प्रेक्षकांसाठी अनोखी संधी घेऊन आलाय.

(A unique opportunity for the movie 'Veer Murarbaji' on the occasion of Shiv Jayanti )

'पावनखिंड' या लोकप्रिय ऐतिहासिक सिनेमाची निर्मिती संस्था आल्मन्ड क्रिएशन हि संधी घेऊन आलंय. लवकरच 'वीर मुरारबाजी.. पुरंदरची युद्धगाथा' या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

या ऐतिहासिक युद्धपटात काम करण्याची किंवा सेटवर येऊन भेटण्याची, चित्रीकरण पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळू शकते.

याशिवाय शूटिंगमध्ये सहभागी झालेल्यांना आलमंड्स क्रिएशन्सकडून अभिनयाचं प्रशस्तीपत्रकही देण्यात येणार आहे. खालील फोटोमध्ये सर्व तपशील देण्यात आलाय

सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात लढाया करणारे शूरवीर आणि पराक्रमी मावळे स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावण्यासाठी सदैव तयार असत.अशा पराक्रमी आणि निष्ठावंत मावळ्यांमध्ये रणधुरंधर नरवीर मुरारबाजी देशपांडे हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते.

या सिनेमाच्या निमित्ताने स्वराज्याच्या इतिहासात पुरंदरचे ‘काळभैरव’ म्हणून ओळख असणारे मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा रुपेरी पडदयावर पाहायला मिळणार आहे.

१६६५ च्या आषाढात मिर्झाराजे जयसिंग आणि सरदार दिलेरखान यांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला. त्यावेळी पुरंदरचे किल्लेदार असलेले मुरारबाजी देशपांडे फक्त बलाढ्य सातशे मावळ्यांसह दिलेरखानाच्या फौजेवर चालून गेले. आणि उत्तुंग पराक्रम केला.

फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड’ सिनेमांच्या घवघवीत यशानंतर आलमंड्स क्रिएशन्स व ए.ए.फिल्म्स यांनी ‘वीर मुरारबाजी...पुरंदरची युद्धगाथा’ सिनेमाची घोषणा केली आहे. या सिनेमाची निर्मिती अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर, भाऊसाहेब आरेकर यांनी केलीय.

फर्जंद, फत्तेशिकस्त’ आणि ‘पावनखिंड सिनेमांनंतर अभिनेता अंकित मोहन पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी सज्ज झालाय. हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT