Aai Kuthe Kay Karte latest update sanjana said veena aniruddha is fraud person sakal
मनोरंजन

Aai Kuthe Kay Karte: वीणाला मोठा धक्का! अन्याच्या भामटेपणाची थेट संजनानेच दिली कबुली, म्हणाली; हा तुला..

'आई कुठे काय करते' मालिकेत मोठा ट्विस्ट..

नीलेश अडसूळ

Aai Kuthe Kay Karte marathi serial latest update: आई कुठे काय करते मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणार आहे. मालिकेत काही दिवसांपुर्वीची आशुतोषची बहीण वीणाची एंट्री झालीय.

विशेष म्हणजे वीणा अनिरुद्धची बिझनेस पार्टनर असल्याचे अनिरुद्ध सर्वांना सांगतो आणि अरुंधतीसह आशुतोषला मोठा धक्का बसतो. अनिरुद्ध वीणाचा वापर करून तीची कंपनी बाळकवत आहे.

आणि यासाठी तो दिवसेंदिवस अनिरुद्ध आशुतोष आणि वीणा यांच्यामध्ये फुट पाडत आहे. विशेष म्हणजे वीणाचं मान जिंकण्यात अनिरुद्धला यश आलं आहे. त्यामुळे वीणाही त्याच्यामागे वाहवत जात आहे.

पण अनिरुद्ध विश्वासघातकी आहे, हे तिला आशुतोष आणि अरुंधती समजावून सांगूनही तिने विश्वास ठेवला नाही. आता थेट संजनानेच अनिरुद्ध बाबत महत्वाची भूमिका घेतली आहे. अनिरुद्ध कसा आहे, याबाबत ती जरा स्पष्टच बोलली आहे. हा व्हिडिओ आता तूफान व्हायरल झाला आहे.

(Aai Kuthe Kay Karte latest update sanjana said veena aniruddha is fraud person)

नुकत्याच झालेल्या भागात आपण पाहिलं की, अरुंधती वीणाला अनिरुद्ध कसा आहे ते सांगते. पण वीणा अरुंधती कडे दुर्लक्ष करते. त्यानंतर आशुतोष आणि नितीन अनिरुद्धने केलेल्या कंपनीतील घोळा विषयी चर्चा करत असतानाच वीणा येते आणि अनिरुद्धची निंदा ऐकते.

हे ऐकून त्यांच्यावर विश्वास ठेवण्याऐवजी ती त्यांनाच ओरडते. त्यामुळे अनिरुद्धवर तिचा इतका विश्वास बसला आहे की, त्याच्या विषयी ती काहीही ऐकून घेत नाहीय. (aai kuthe kay karte)

अशातच तिच्या समोर संजना येते. आणि संजनाही अनिरुद्ध विषयी वाईटच बोलते. हे बोलताना अनिरुद्ध समोर असतो. त्यामुळे वीणाला मोठा धक्का बसतो.

नुकताच या भागाचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये अनिरुद्ध आणि वीणा त्यांचे काम आटोपून निघत असतानाच संजना त्यांना रस्त्यात भेटते. त्यावेळी अनिरुद्ध संजनाला म्हणतो, 'तू मला सांगितलं असतं तर मी तुला आणायला आलो असतो..'..

त्यावर वीणा म्हणते, 'तुम्ही दोघं सतत एकमेकांची काळजी घेत असता..' हे ऐकून संजना मात्र गप्पा बसत नाही. ती वीणाला म्हणते, 'एक सांगू तुला.. तू चुकीच्या माणसावर विश्वास ठेवत आहेत. एक दिवस हा तुलाही फसवून कधी निघून जाईल, हे तुलाही कळणार नाही'

संजनाच्या या वाक्याने वीणा हादरून जाते. आता पुढे काय होणार हे आगामी भागात कळेलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT