aai kuthe kay karte madhurani prabhulkar emotional after see fan gift wall painting  SAKA
मनोरंजन

Madhurani Prabhulkar: फॅनने दिले असं गिफ्ट की मधुराणी प्रभुलकरच्या डोळ्यात आलं पाणी, व्हिडीओ व्हायरल

मधुराणीच्या फॅनने तिला एक सुंदर गिफ्ट दिलंय

Devendra Jadhav

Madhurani Prabhulkar News: आई कुठे काय करते ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. आई कुठे काय करते मालिकेत मधुराणी प्रभुलकर अरुंधतीची लोकप्रिय भुमिका साकारत आहे.

मधुराणीच्या आयुष्यात नुकतीच एक भावुक करणारी गोष्ट घडलीय. मधुराणीला तिच्या फॅनने असं गिफ्ट दिलंय ज्यामुळे तिच्या डोळ्यातून पाणी आलंय.

(aai kuthe kay karte madhurani prabhulkar emotional after see fan gift wall painting)

aमधुराणी प्रभुलकरला फॅनने दिलं खास गिफ्ट

मधुराणी प्रभुलकरने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात मधुराणी फॅनने दिलेलं गिफ्ट उघडताना दिसतेय.

हे गिफ्ट पाहून मधुराणीला सुखद धक्का बसला आणि ती पाहतच राहिली. मधुराणीला तिच्या एका फॅनने पेंटिंग गिफ्ट करुन पाठवलंय.

हे सुंदर पेंटिंग पाहून मधुराणीने तिच्या भावना व्यक्त केल्यात. मधुराणी लिहीते, "इतक्या प्रेमाने इतकं सुंदर painting कुणी करून पाठवल्यावर मन इतकं भरून येतं की डोळयातून वाहून जातं. शिल्पा पवार ह्या कलावतीचे खूप खूप आभार."

मधुराणीने दिला राजीनामा

मधुराणी तिचा नवरा प्रमोद प्रभुलकर सोबत मिरॅकल्स डान्स अकॅडमी हि अभिनयाची अकॅडमी चालवत असते. आजवर या अभिनय शाळेतून अनेक उत्तमोत्तम कलाकार बाहेर पडले आहेत.

या अभिनय शाळेतून आजवर हृता दुर्गुळे, किरण गायकवाड. शिवानी बावकर असे अनेक कलाकार पुढे आले आहेत. पण आता मधुराणीने या अकॅडमीचा संचालक पदाचा राजीनामा दिला आहे.

मधुराणीच्या घटस्फोटाच्या चर्चा ठरला निव्वळ अफवा

काही दिवसांपुर्वी मधुराणीने तिचा नवरा प्रमोद प्रभुलकर सोबत सुरु केलेल्या मिरॅकल्स डान्स संस्थेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला.

ती अचानक या पदावरुन निघाल्यामुळे अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यातच मधुराणीने तिचा नवरा प्रमोद प्रभुलकर यांच्या घटस्फोटाच्या बातम्याही पसरल्या. मात्र प्रमोद प्रभुलकरनं या बातम्या फेटाळून लावल्या.

आता मधुराणीने अखेर संस्थेच्या संचालकपदाचा राजीनामा का दिला याचा खुलासा केला आहे. ती म्हणाली की, "इतका खळबळजनक किंवा चर्चा करण्यासारखा विषय नव्हता. अनेक वर्षांपूर्वी तिने आणि प्रमोदने मिरॅकल अकॅडमी सुरू केली. मात्र नंतर तिला लक्षात आलं की त्या अकॅडमीसाठी तिला वेळच मिळत नव्हता."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Mote : माजी आमदार राहुल मोटे तुतारी सोडून हातात बांधणार घड्याळ! अखेर 'ई-सकाळ'च्या बातमीवर शिक्कामोर्तब

Kothrud police case: वादग्रस्त पीएसआय प्रेमा पाटील कोण? सौंदर्यस्पर्धेत विजेतेपद ते मारहाणीचा आरोप

Owaisi praises Siraj: ''पूरा खोल दिया पाशा...'' , ओवैसींनी केलं सिराजचं खास हैदराबादी स्टाइलने कौतुक

Horoscope 2025 : उद्या 5 ऑगस्टला होणार आहे लक्ष्मी योगाचा उत्तम संयोग, कुंभ राशीबरोबर या 5 राशींचं नशीब उजळणार !

Latest Marathi News Updates Live : न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्याला एक लाखांचा दंड

SCROLL FOR NEXT