Aai Kuthe Kay Karte Esakal
मनोरंजन

Aai Kuthe Kay Karte: आशुतोष लवकरचं चढणार बोहल्यावर! अरूंधतीने दिली प्रेमाची कबुली..

Vaishali Patil

  मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय मालिका ' आई कुठे काय करते'  पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मालिकेची कथा पुन्हा एकदा अरुंधती आणि आशुतोष यांच्याभोवती फिरतांना दिसत आहे.

अरुंधतीच्या आयुष्यात सध्या बऱ्याच घडामोडी घडत आहेत. पण चाहते ज्या क्षणाची वाट पहात होते तो क्षण आता आला आहे. अरुंधतीने आशुतोषला प्रेमाची कबुली दिली आणि आशुतोषने देखील त्याचं अरुंधतीवरचं प्रेम मान्य केलं.

अरुंधतीच्या आयुष्यातील संकटे काही संपण्याचं नावं घेत नाहीत. एक अडचण गेली की दुसरी समस्या येऊन उभी राहते. त्यात प्रेक्षकांना उत्सुकता होती ती त्याच्यातील वादविवाद मिटून दोघांच्या प्रेमाच्या कबुलीची आणि अखेर त्या दोघांनी आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.

'आई कुठे काय करते' या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यात अरुंधती आशुतोषला फोन करते. दोघेही एकमेकांना फोन करतात. त्यानंतर अरुंधती आशुतोषला भेटते. त्यांला 'मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे.' असं सांगते. तेव्हा आशुतोष फारच आनंदी होतो. तो म्हणतो, 'तुला तुझ्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही याची मी तूला खात्री देतो अरुंधती.' अखेर आता दोघांच्याही मनातील प्रेम ओठांवर आलं आहे.

तर दुसरीकडे अनिरुद्धाचा डाव फसला आहे, अनिरुद्ध अनुष्काला अरुंधतीच्या नात्याबद्दल सांगतो त्याला वाटत आता त्या दोघांचं नात तुटेल. अरुंधती घरी येताच तो तिला विचारतो, 'मग कधी आहे लग्न' त्यावर अरुंधती म्हणते कि, 'मी स्वतः सगळं सांगेन तुम्हाला पण वेळ आल्यावर अरूंधतीच्या उत्तराने अनिरुद्ध चांगलाच बिथरलेला दिसतो.

मात्र आता प्रेक्षकांना आतुरता आहे ती अरूंधती आणि आशुतोषच्या लग्नाची. लवकरचं मालिकेत या दोघांच लग्न पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT