aalay mazya rashila new marathi movie teaser out cast chinmay mandlekar  sakal
मनोरंजन

Chinmay Mandlekar: आलाय माझ्या राशीला!.. गोडसे नंतर चिन्मय मांडलेकर नव्या भूमिकेत..

'आलंय माझ्या राशीला' चित्रपटाचा धमाकेदार टिझर प्रदर्शित..

नीलेश अडसूळ

marathi movie: आपल्या कसदार लिखाणाने आणि संयत अभिनयामुळे ओळखला जाणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर सध्या 'आलंय माझ्या राशीला' असं म्हणतोय. तो असं का म्हणतोय? त्याच्या राशीला नेमके कोण आलंय? हा प्रश्न तुम्हाला ही पडला असेलच.. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला १० फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या आनंदी वास्तू आणि साईकमल प्रोडक्शन निर्मित 'आलंय माझ्या राशीला' या मराठी चित्रपटातून मिळणार आहे. (aalay mazya rashila new marathi movie teaser out cast chinmay mandlekar )

नुकताच या चित्रपटाचा धमाकेदार टिझर प्रदर्शित झाला असून अल्पावधीतच तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात चिन्मय मध्यवर्ती भूमिकेत असून विविध राशींच्या गमतीजमती त्यांची वैशिष्ट्य आपल्याला चित्रपटातून जाणून घेता येणार आहेत. यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पहावा लागेल.

प्रत्येक राशींची काही स्वभाववैशिष्टय़े, सौंदर्य आहेत. या वैशिष्टय़ांचा मानवी जीवनावर खूप मोठा प्रभाव असतो. याच सौंदर्याची गंमत दाखविणारा, राशींच्या उत्सुकतेला अभ्यासाच्या आणि विज्ञानाच्या आधारे जोडणारा ‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटाचं दिग्दर्शन अजित शिरोळे यांनी केलं आहे. सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि अश्विनी पिंपळकर चित्रपटाचे निर्माते आहेत.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

अभिनेते चिन्मय मांडलेकर सोबत अलका कुबल, मोहन जोशी, निर्मिती सावंत, प्रसाद ओक, अतुल परचुरे, मंगेश देसाई, उषा नाईक, भार्गवी चिरमुले, अश्विनी कुलकर्णी, स्वप्निल राजशेखर‌, पौर्णिमा अहिरे, दिगंबर नाईक, संग्राम चौगुले, सिद्धार्थ खिरीड यांच्या या चित्रपटात दमदार भूमिका आहेत. युवा अभिनेता प्रणव पिंपळकर या चित्रपटातून आपलं मनोरंजन क्षेत्रातील पदार्पण करताना दिसून येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koregaon Bhima Inquiry : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात नवे वळण; ठाकरे यांचे आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर!

"आमच्यात भांडण.." रितेशबरोबरच्या वादांच्या चर्चांवर रवी जाधव व्यक्त ; राजा शिवाजी सिनेमाबद्दल म्हणाले..

German Silver : चांदीला स्वस्त पर्याय म्हणून जर्मन कारागिरांनी तयार केला सेम टू सेम धातू, पण तुम्ही फसू नका; फरक कसा ओळखाल? जाणून घ्या

Ambegaon News : कपिल काळेंचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश; राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का!

White vs Brown vs Multigrain Bread: व्हाइट, ब्राउन की मल्टीग्रेन ब्रेड? वजन कमी करण्यासाठी काय आहे बेस्ट? एका क्लिकवर जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT