Aamir Khan And Akshay Kumar Film News Aamir Khan And Akshay Kumar Film News
मनोरंजन

आमिर खानला अक्षय कुमारच्या ‘रक्षा बंधन’ची भीती; म्हणाला, मी ट्रेलर पाहिला...

तिकीट खिडकीवरही चांगली कामगिरी करेल

सकाळ डिजिटल टीम

Aamir Khan And Akshay Kumar Film News गुरुवारी (ता. ११ ऑगस्ट) आमिर खानचा (Aamir Khan) मोस्ट अवेटेड चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ रिलीज होणार आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर केवळ ‘लाल सिंह चड्ढा’च नाही तर अक्षय कुमारचा ‘रक्षा बंधन’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच आमिर खान आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांच्या चित्रपटात चुरशीची स्पर्धा होणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आमिर खानने ‘रक्षा बंधन’वर प्रतिक्रिया दिली आहे.

‘रक्षा बंधन’ व ‘लाल सिंह चड्ढा’ (Lal Singh Chaddha) हे दोन्ही बॉलिवूडचे मोठे सिनेमे आहेत. एकाच दिवशी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित होणे प्रेक्षकांसाठी थोडं आश्चर्यचकित करणारे आहे. परंतु, आमिर किंवा अक्षयने त्यांच्या चित्रपटाच्या तारखा पुढे-मागे हलवण्याचा विचार केला नाही. आतापर्यंत आमिर खान (Akshay Kumar) ‘रक्षाबंधन’वर मौन बाळगून होता. मात्र, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याने आनंद एल रॉय यांच्या चित्रपटाचे कौतुक केले आहे.

मुलाखतीत आमिर खान (Aamir Khan) ‘रक्षा बंधन’वर बोलताना म्हणाला, मी ट्रेलर पाहिला. ही एक सुंदर कथा आहे. आनंद एल राय दिग्दर्शित ‘रक्षा बंधन’ हा चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’सोबत तिकीट खिडकीवरही चांगली कामगिरी करेल. ‘लाल सिंह चड्ढा’ रिलीज होण्यापूर्वी आमिर खानचे ‘रक्षा बंधन’वर (Raksha Bandhan) असे बोलणे हेच सांगत आहे की, तो ‘रक्षाबंधन’च्या यशाची भीती आहे.

अक्षयचे चित्रपट सांगता येत नव्हते

आमिर खान हा अक्षय कुमारच्या ‘रक्षा बंधन’च्या ट्रेलरचे कौतुक करीत आहे. ‘कॉफी विथ करण’मध्ये अक्षय कुमारच्या तीन चित्रपटांची नावंही तो काढू शकला नाही. यानंतर अक्षय आणि आमिरमध्ये काही दुरावा असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. बडे कलाकार आणि चित्रपट यांच्यात हे सर्व सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Latest Marathi News Live Update : विशाळगडावरील कुर्बनीला कोल्हापूर सर्किट बेंचकडून परवानगी

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

SCROLL FOR NEXT