Aamir khan talk about daughter ira fiance says my daughter esakal
मनोरंजन

Aamir Khan Daughter Ira Wedding: 'माझा जावई हा....' सासरेबुवा होणाऱ्या आमिरनं काय सांगितलं माहितीये?

आमिर त्या मुलाखतीमध्ये म्हणतो की, लग्नात मी खूपच भावनिक होईल. लग्न खूपच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असेल आणि ते स्पेशलही असेल.

युगंधर ताजणे

Aamir khan talk about daughter ira fiance says my daughter : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा त्याच्या लेकीमुळे आय़रामुळे चर्चेचा विषय आहे. तिच्या शुभमंगलविषयीच्या बातम्यांना उधाण आले आहे. यात आमिरनं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जावयाविषयी जी प्रतिक्रिया दिली आहे त्याची चर्चा होत आहे. आमिर काय म्हणाला हे आपण जाणून घेणार आहोत.

आमिर त्या मुलाखतीमध्ये म्हणतो की, लग्नात मी खूपच भावनिक होईल. लग्न खूपच वेगवेगळ्या कारणासाठी चर्चेत असेल आणि ते स्पेशलही असेल. मी खरच खूप भावनिक आहे. त्यादिवशी मी तर खूप रडेल. आमच्या कुटूंबात चर्चा सुरु झाली आहे की, मला कोण सांभाळणार. मी ना माझे हसणे कंट्रोल करु शकतो की रडणे...अशा शब्दांत आमिरनं त्याची प्रतिक्रिया दिली होती.

आयराचे लग्न होणार आहे. तिनं ज्या मुलाची निवड केली आहे त्याचे टोपण नाव पोपॉय असे आहे. तो तिचा ट्रेनर आहे. त्याचे खरे नाव नुपूर आहे. तो एक चांगला व्यक्ती आहे. त्याचे आयरावर खूप प्रेम आहे. त्यानं तिची खूप काळजी घेतली आहे. ती जेव्हा डिप्रेशनमधून जात होती तेव्हा त्यानं तिला खूपच साथ दिली. माझा जावई हा खूपच प्रेमळ आणि समजूतदार आहे. त्यानं आयराला इमोशनली खूपच आधार दिला आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. असे आमीरनं त्या मुलाखतीतून सांगितले होते.

ब्रेक घेणार का?

लाल सिंग चढ्ढानंतर आमिर खानला मोठा धक्का बसला होता. त्याला प्रेक्षक आणि चाहत्यांकडून अशा प्रकारे प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा नव्हती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं आमिरला निराश केले होते. त्यावरुन खूप वादही झाला होता. एका हॉलीवूड चित्रपटाचा हिंदीत रिमेक करणे हे आमिरच्या चाहत्यांना आवडले नव्हते.

आता आमिर सितारे जमीन पर नावाच्या एका चित्रपटातून कमबॅक करणार असल्याचे बोलले जात आहे. त्या चित्रपटाकडून आमिरच्या चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. आमिरनंही लाल सिंग चढ्ढापासून प्रेसशी बोलताना काळजी घेतली आहे. वास्तविक त्यानं त्यावेळी देखील आपल्या बोलण्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील माफीही मागितली होती. मात्र अनेकांना तेव्हाही आमिरचा तो अंदाज आवडला नव्हता.

कुटूंबासमवेत सध्या आमिर बेस्ट टाईम इंजॉय करत असल्याचे दिसून येत आहे. त्यानं आता त्याचा मुलगा जुनैद खान विषयी एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली होती. तो एका चित्रपटातून बॉलीवूडमध्ये डेब्यू करतो आहे. आमिरनं त्याच्या स्वभावाविषयी आणि शिस्तीबद्दल सांगितले होते. त्याला जसे वागावेसे वाटते त्यासाठी तो स्वत जबाबदार असेल याची जाणीव त्याला करुन दिली आहे. यामुळे मला कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. असे आमिरनं त्या मुलाखतीमध्ये म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dehradun Sahastradhara Cloudburst : सहस्रधारात पावसाचा हाहाकार, दुकाने गेली वाहून; अनेक जण बेपत्ता

Gemini AI Saree Trend Alert: जेमिनी नॅनो बनाना AI साडीचा ट्रेंड फॉलो करताना व्हा अलर्ट, व्हिडिओ शेअर करत महिलेने समोर आणला धक्कादायक प्रकार

Stock Market Opening: वीकली एक्सपायरीच्या दिवशी बाजाराची सुस्त सुरुवात; सेंसेक्स 70 अंकांनी वर, कोणते शेअर्स वाढले?

Latest Marathi News Updates : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

ब्रेक अप के बाद! हार्दिक पांड्याच्या आयुष्यात नवीन अभिनेत्री; Jasmin Walia सह नातं संपलं? Mahieka Sharma ची आयुष्यात एन्ट्री

SCROLL FOR NEXT