aamir khan 
मनोरंजन

मुलगी इराचा कहर, बॉयफ्रेंडचा तो फोटो शेयर केला, आमीरनं तर...

बॉलीवूडमध्ये मिस्टर परफेक्निस्ट (bollywood actor aamir khan) म्हणून आमीर खानची ओळख आहे.

सकाळ डिजिटल टीम

Aamir Khan: बॉलीवूडमध्ये मिस्टर परफेक्निस्ट (bollywood actor aamir khan) म्हणून आमीर खानची ओळख आहे. येत्या वर्षात त्याचा बहुचर्चित असा लाल सिंग चढ्ढा (Lal singh chaddha) नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ठग्स ऑफ हिंदूस्थाननंतर त्याच्या नव्या चित्रपटाची प्रेक्षकांना ओढ लागली आहे. सध्या तो चर्चेत आला आहे त्याचे कारण त्याची मुलगी इरा. इरानं (ira-khan) तिच्या बॉयफ्रेंडचे असे काही फोटो शेय़र केले आहेत की त्यामुळे आमीरलाच शॉक बसणार की काय अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहे. सोशल मीडियावरील त्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. इरानं यापूर्वी देखील तिच्या बॉयफ्रेंडचे नुपूरचे अशाप्रकारचे फोटो व्हायरल केले असल्याचे दिसून आले आहे.

नुपूर (Nupur Shikhare) हा काही काळ आमीरचा देखील फिटनेस कोच (Fitness Coach) राहिला आहे. इरानं नुपूरच्या फॅमिलीसोबत फोटो शेयर केले होते. आयरानं आता नुपूरसोबत एक फोटोशुट शेयर केलं आहे. त्यामधील फोटो इतके भन्नाट आहेत की, त्याची सध्या सोशल मीडिय़ावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यावर आमीरची काय प्रतिक्रिया काय असेल असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. गेल्या काही दिवसांसापासून आयरानं वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका सामाजिक संस्थेशी जोडल्या गेलेल्या आयरानं अनेक लोकोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्याविषयीच्या पोस्टही तिनं शेयर करुन चाहत्यांना त्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहनही केले आहे.

तुम्हाला आयराच्या बॉयफ्रेंडविषयी सांगायचे झाल्यास तो एक प्रोफेशनल फिटनेस कोच आहे. इरानं यापूर्वी देखील त्याच्यासोबत वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशुट केले आहे. ते व्हायरलही केलं आहे. इरा एका मानसोपचारतज्ञाकडे जावून उपचार घेत असल्याचे तिनं तिच्या एका पोस्टमध्ये सांगितलं होतं. कोरोनाच्या काळात तिला आपण मानसिकदृष्ट्य़ा अधिक दुबळे झालो आहोत असे वाटत होते. यावेळी तिच्या बॉयफ्रेंडनं तिला मानसिक आधार दिल्याचेही तिनं एका पोस्टमधून शेयर केले होते. काही दिवसांपासून इरा आणि नुपूरच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु आहे. त्यावर आमीरकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT