aamir khan daughter Ira Khan - Nupur Shikhare pre wedding Marriage ceremony in Marathi style  SAKAL
मनोरंजन

Ira Khan - Nupur Shikhre: केळीचं पान अन् पंगत! मराठमोळ्या पद्धतीत आमिर खानच्या लेकीच्या लग्नविधींना सुरुवात

आमिर खानच्या लेकीच्या लग्नविधींना मराठमोळ्या थाटात सुरुवात

Devendra Jadhav

Ira Khan - Nupur Shikhre Wedding Updates:

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक इरा खानच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता आहे. इरा तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

आमिर खानच्या लेकीच्या लग्नविधींना सुरुवात झालीय. मंगळवारी रात्री आमिरच्या लेकीच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यावेळी अस्सल मराठमोळा थाट दिसून आला. सविस्तर जाणून घ्या.

आमिर खानची मुलगी इरा खानच्या लग्नाच्या विधी आणि सोहळ्यांना सुरुवात झाली आहे. इरा ही आमिरची पहिली पत्नी रीना दत्ताची मुलगी आहे, ती 3 जानेवारीला तिचा प्रियकर नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधणार आहे. मंगळवारी प्री-वेडिंग विधींसाठी आयोजित या कार्यक्रमात आमिरची एक्स पत्नी किरण राव आणि मुलगा आझाद देखील उपस्थित होते.

इरा खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये कार्यक्रमाला उपस्थित असलेले पाहुणे जेवणाच्या टेबलवर पंगतीत एकत्र बसलेले दिसले, जिथे त्यांना महाराष्ट्रीयन जेवण दिले जात होते.

Ira Khan - Nupur Shikhare pre wedding Marriage ceremony
Ira Khan - Nupur Shikhare pre wedding Marriage ceremony

पुढच्या फोटोमध्ये इरा तिच्या मैत्रिणीसोबत दिसली होती, ज्यामध्ये ती लाल रंगाच्या साडीत सुंदर दिसतेय. कपाळावर बिंदी आणि सोनेरी झुमके तिने परिधान केले आहेत. इराची मैत्रीण आणि 'लिटिल थिंग्स' फेम अभिनेत्री मिथिला पालकर देखील या सोहळ्याला उपस्थित होती. इराने तिच्यासोबतचे अनेक फोटोही शेअर केले आहेत.

आमिरची लेक इरा 3 जानेवारी 2024 रोजी नुपूरसोबत लग्न करणार असल्याची शक्यता आहे. इरा खानचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे एक प्रसिद्ध फिटनेस तज्ञ आणि सल्लागार आहे. तो आमिर खानचा ट्रेनरही असून तो इरालाही फिटनेस ट्रेनिंग देत असे.

यादरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केल्याचे सांगितले जाते. नुपूर बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा देखील ट्रेनर आहे. इरा - नुपूरच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nipah Virus Alert : सावधान! पश्चिम बंगालमध्ये आढळले ‘निपाह’ विषाणूचे रूग्ण; केंद्र सरकारकडून हालचालींना वेग

Pune News : सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचा एल्गार; बिनविरोध निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले!

Bhogi Horoscope : भोगीनंतर 'या' 5 राशींचे भाग्य बदलणार; अचानक मिळतील पैसे, रखडलेली कामे पूर्ण होणार अन् ऑफिसमधून मिळेल खुशखबर

PMC Abhay Yojana : पुणेकरांनो घाई करा! अभय योजनेचे शेवटचे ७२ तास शिल्लक; ७५ टक्के सवलत गमावू नका!

Vande Bharat Sleeper Train: प्रतीक्षा संपली! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ शनिवारपासून धावणार

SCROLL FOR NEXT