Reena Dutta(1st wife of aamir),Aamir Khan, Kiran Rao(2nd wife of aamir Khan) Google
मनोरंजन

'आमिरनं दोन्ही घटस्फोटांसाठी जबाबदार ठरवलय ...'; वाढदिवशीच केला खुलासा

आमिर खानने ५७ वा वाढदिवस साजरा करताना आयुष्यातील अनेक कडू-गोड आठवणींना उजाळा दिला आहे.

प्रणाली मोरे

आमिर खान(Aamir Khan) त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा करीत आहे. त्यानं त्याच्या मुलाखतीत पहिल्यांदाच त्याच्या दोन घटस्फोटांविषयी मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला,''मी माझ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडल्या नाहीत. मी माझ्या कामात इतका व्यग्र होतो की माझं एक कुटुंब आहे हेच मी विसरलो होतो''.. २०१८ मध्ये आमिर खान 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या सिनेमात दिसला होता. आमिरच्या फ्लॉप सिनेमांपैकी एक हा सिनेमा आहे. आता लवकरच आमिरचा 'लाल सिंग चड्ढा' हा सिनेमा आपल्या भेटीस येत आहे. या सिनेमात त्याच्यासोबत करिना कपूर महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.

आमिर खाननं त्याचं पहिलं लग्न रीना दत्तासोबत केलं होतं. रीना दत्ता आणि आमिरला दोन मुलं आहेत. ज्यांची नावं आयरा खान आणि जुनैद खान अशी आहेत. आमिरशी विभक्त झाल्यानंतर रीना आणि ही दोन मुलं एकत्र राहत आहेत. आमिर आणि रीनानं तब्बल १६ वर्षांच्या संसारानंतर एकमेकांपासून विभक्त होण्याचं ठरवलं. त्यानंतर काही वर्षांनी आमिरनं दिग्दर्शिका किरण रावशी दुसरं लग्न केलं. आमिर आणि किरणला एक मुलगा आहे,ज्याचं नाव आझाद राव खान आहे. गेल्याच वर्षी २०२१ मध्ये आमिर आणि किरणने देखील तब्बल १५ वर्षांनंतर आपल्या घटस्फोटाचा निर्णय सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिर केला होता.

आपल्या दोन्ही घटस्फोटांविषयी स्पष्टिकरण देताना आमिर खान म्हणाला,''मी माझ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडल्या नाहीत. माझे आईवडील,माझी भावंडे,माझी पहिली पत्नी रीना,दुसरी पत्नी किरण आणि त्या दोघींचे आईृवडील,माझी मुलं आणि यांच्यासोबतच माझी इतर जवळची माणसं सगळ्यांच्याच बाबतीत मी चुकलोय हे मला माहित आहे. मी अठरा वर्षांचा असतान फिल्म इंडस्ट्रीत आलो. मला खूप शिकायचं होतं,मला खूप गोष्टी करायच्या होत्या. मला आज याची जाणीव होतेय,माझ्या कुटुंबाला माझा वेळ हवा असताना मी तो दिला नाही. मी माझ्या प्रेक्षकांसोबत अधिक वेळ घालवला सिनेमांच्या माध्यमातून. त्यांना मी अधिक वेळ दिला. मी माझ्या कामाला वेळ दिला. कामाशी माझं नातं मजबूत केलं. मी समजत होतो,माझं कुटुंब माझ्या या निर्णयात सोबत आहे. मला माझ्या प्रेक्षकांचं मन जिंकायचं होतं. आणि मी त्या जगात हरवून गेलो. आणि मला माझ्या कुटुंबाचा विसर पडला''.

आमिर पुढे म्हणाला,''मी माझी मुलगी आयराला वेळच दिला नाही. आज ती २३ वर्षांची आहे. पण जेव्हा ती ४-५ वर्षांची होती मी तिच्यासोबत नव्हतो. मी माझ्या सिनेमाच्या शूटमध्ये बिझी असायचो. प्रत्येक मुलाला ज्या वयात पालक हवे असतात तेव्हाच मी माझ्या मुलांसोबत नव्हतो. मी त्यांच्यासोबतचे अनेक क्षण मिस केलेयत. जे आता परत येणं शक्य नाही''. आपल्या घटस्फोटांसंदर्भात आणि कुटुंबाविषयी आमिर खान पहिल्यांदाच अशाप्रकारे व्यक्त झाला आहे. आयरा खान सध्या तिच्या बॉयफ्रेंडसोबतच्या पोस्टमुळे अनेकदा चर्चेत असते. तिनं डिप्रेशनसंदर्भात नुकतंच आपलं मत मांडलं होतं. २०१९ मध्ये तिनं एक ड्रामा दिग्दर्शित करुन दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Political : उमेदवारी नाकारताच राष्ट्रवादी शरद पवार पक्षात खदखद; पुण्यात बैठकीत इच्छुकांचा गोंधळ!

Vasai Virar Election : वसई–विरार महापालिका निवडणुकीत माघारींचा धडाका; २८६ उमेदवार बाहेर; ५४७ रिंगणात!

Tamhini Ghat Accident: 'त्याच' थारवर जाऊन कार कोसळली; ताम्हिणी घाटात पुन्हा तसाच अपघात, एकाचा मृत्यू

Paithan Political : उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात; पैठणच्या राजकारणात उत्सुकता ताणली!

Ranjangaon MIDC Scam : रांजणगाव एमआयडीसीत नोकरीचे आमिष; ४७ तरुण-तरुणींची सत्तर हजारांची फसवणूक; दोघांना अटक!

SCROLL FOR NEXT