aamir khan SAKAL
मनोरंजन

Aamir Khan: म्हातारा झालास कि काय? लग्नात आमिर खानला काठीचा आधार, फॅन्सना काळजी..

आमिर खान सध्या अनेक लोकांच्या लग्नसोहळ्यात दिसून येतोय

Devendra Jadhav

Aamir Khan News: लाल सिंग चड्ढा फ्लॉप झाल्यांनतर आमिर खानने बॉलिवूडमधून काहीसा संन्यास पत्करलाय. पण अचानक आमिर खान पुन्हा एकदा लाइमलाईट मध्ये आलाय. आमिर खान सध्या अनेक लोकांच्या लग्नसोहळ्यात दिसून येतोय. नुकताच आमिर खान वॉल्ट डिसने आणि स्टार इंडियाचे अध्यक्ष असलेल्या के. माधवन यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्याला उपस्थित होता.

(amir khan grab a walking stik in k madhvan son wedding)

या लग्नसोहळ्यापेक्षा आमिर खानची चर्चा जास्त झाली. कारण सुद्धा खास आहे. आमिर खान लग्नसोहळ्यात पारंपरिक वेशभूषेत आलेला. या लग्नसोहळ्यात आमिर खान काठीचा आधार घेऊन चालताना दिसला.

आमिर खानच्या हातात काळ्या रंगाची काठी होती. त्यामुळे आमिरच्या फॅन्सना मात्र काळजी लागून राहिली आहे. आमिरला काठीचा आधार घेऊन अचानक का चालावं लागतंय असा प्रश्न अनेकांना पडलाय.

आमिरला अशा अवतारात पाहून लोकं विचारत आहेत.. आमिर खानला अचानक काय झालं? काही लोक असेही म्हणत आहेत की, आमिर खान आजकाल लग्नसोहळ्यांमध्ये त्याची उपस्थिती दर्शवत आहे.

कदाचित लाल सिंग चड्ढा फ्लॉप झाल्यामुळे आमिर नुकसान भरपाई करत आहे. काहीच दिवसांपूर्वी अभिनेता कार्तिक आर्यन सोबत नुकताच भोपाळमध्ये एका लग्नात सहभागी होता. त्यामुळे स्पॉन्सरशिप घेऊन आमिर खान लग्नाला जात आहे असं फॅन्स म्हणत आहेत.

तर काही फॅन्सना मात्र आमिर खानची खरंच खुप काळजी वाटतेय. वय झालं वाटत तुझं, तुझ्या हातातली काठी शोभून दिसत नाहीये, वय झालं म्हणून आमचा लाडका सुपरस्टार थकला असं फॅन्स म्हणत आमिर खान बदल सहानुभूती दर्शवत आहेत. आमिर खान खास साऊथ इंडियन वेशभूषा परिधान करून के. माधवन यांच्या मुलाच्या लग्नाला गेला होता.

के. माधवन यांच्या मुलाच्या लग्नाला करण जोहर, अक्षय कुमार, मोहनलाल, कमल हसन असे अनेक कलाकार उपस्थित होते. अक्षय कुमारने मोहनलाल सोबत भांगडा केलाय. अत्यंत शाही तरीही पारंपरिक थाटामाटात के. माधवन यांच्या मुलाचं लग्न झालं.

साऊथ आणि बॉलिवूड मधले अनेक कलाकार या लग्नाच्या सोहळ्याला एकत्र आले होते. आमिर खानचा असा वेगळा लूक लक्ष वेधून घेत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deepali Sayyad Claims : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’वरून खळबळ! दिपाली सय्यदला धमक्या, “ते नाव घेतलं तर सर्व काही संपेल...”

Petrol-Diesel Price: तेल कंपन्यांना रोज 550 कोटींचा तोटा! सरकारच्या दाव्यानंतर पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर

Marital Dispute: पत्नीच्या प्रेमसंबंधातून धर्मांतराचा कट? पत्नीच्या वागण्यात बदल झाल्याचा पतीचा दावा, मुंबईतील बँकेकडे मोठी मागणी

Panhala Accident News : नातीचा चेहरा पाहून परतणाऱ्या आजीवर काळाचा घाला, पन्हाळ्यातील घटनेने हळहळ

SRH vs RR, Eliminator: "नेट्समध्ये वैभवला मी...", जोफ्रा आर्चरचे १५ वर्षांच्या सूर्यवंशीला आऊट करण्याबद्दल भन्नाट उत्तर; VIDEO

SCROLL FOR NEXT