aamir khan, kiran rao file image
मनोरंजन

घटस्फोटानंतर आमिर-किरणची पहिली मुलाखत; म्हणाले...

१५ वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. १५ वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या चाहत्यांना त्यांच्या या निर्णयामुळे धक्का बसला. त्यांनी घटस्फोट का घेतला, या दोघांमध्ये नेमकं काय बिनसलं, असे प्रश्न चाहत्यांमध्ये उपस्थित होत होते. आमिर आणि किरणने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये किरण आमिरच्या शेजारी बसलेली आहे. दोघांच्या घटस्फोटानंतरच्या या पहिल्या मुलाखतीची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. (aamir khan kiran rao hold hands address fans after divorce announcement)

मुलाखतीमध्ये आमिर म्हणाला, 'तुम्ही खूप दु:खी झाला असाल. तुम्हाला वाईट वाटले असेल. पण आम्ही तुम्हाला हे सांगू इच्छितो की आम्ही दोघेही आनंदी आहोत. आम्ही एकत्र कुटुंबाच आहोत. आमच्या नात्यामध्ये थोडा बदल झाला आहे. पण आम्ही एकमेकांच्यासोबत आहोत. पानी फाऊंडेशन ही संस्था आमच्या मुलासारखी म्हणजेच आझादसारखी आहे. आम्ही नेहमी एकत्र एका कुटुंबाप्रमाणेच राहणार आहोत. तुमचा सर्वांचा आशीर्वाद आमच्यासोबत असूदेत.'

घटस्फोट घेण्याच्या निर्णय घेतल्यानंतर आमिर आणि किरणने स्पष्ट केले होते की, 'या सुंदर १५ वर्षांमध्ये आम्ही आयुष्यभराचा आनंद, हास्य यांचा अनुभव घेतला आणि त्यातून या नात्यात एकमेकांविषयी आदर, प्रेम आणि विश्वास वाढला. आता आम्हाला आमच्या आयुष्यातील एक नवीन प्रवास सुरू करायला आहे. पण पती-पत्नी म्हणून नाही तर पालक आणि एकमेकांचे कुटुंब म्हणून. विभक्त होण्याची प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच सुरू झाली होती आणि आता आम्ही दोघं वेगवेगळे राहत आहोत. मुलगा आझादचं संगोपन आम्ही दोघं मिळून करणार आहोत. त्याचप्रमाणे आम्ही चित्रपट, पानी फाऊंडेशन आणि इतर प्रोजेक्ट्सवर सोबत काम करणार आहोत. कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींचे खूप आभार, कारण त्यांनी या निर्णयात आमची साथ दिली आणि आम्हाला समजून घेतलं. आमच्या हितचिंतकांनीही शुभेच्छा आणि आशीर्वाद आम्हाला द्याव्यात. घटस्फोट म्हणजे शेवट नसून एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif: कागलमध्ये समेट! हसन मुश्रीफांच्या सून बिनविरोध; शिंदे गटाने घेतली माघार

PM Kisan 21st Installment : मोठी बातमी! पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान योजनेचा २१वा हप्ता केला जारी

U19 World Cup 2026 स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! भारताचे सामने कुठे आणि कधी होणार? जाणून घ्या

मुंबईत भरदिवसा बिल्डरवर झाडल्या गोळ्या, दोन गोळ्या पोटात घुसल्या; गोळीबाराच्या घटनेनं खळबळ

Anmol Bishnoi: अखेर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोलला भारतात आणलं; NIA कडून अटक, कसा बनला भारतातील 'मोस्ट वॉन्टेड'?

SCROLL FOR NEXT