Aamir Khan to produce a Light Hearted Comedy Drama  esakal
मनोरंजन

Fatima Sana Shekh : 'दंगल' नंतर आमिर अन् फातिमा पुन्हा एकत्र, दिसणार नव्या भूमिकेत!

आमिरला लाल सिंग चढ्ढानं अनेक धडे दिले. खासकरुन मीडियासमोर बोलताना काय काळजी घ्यावी हे आमिरला कळून चुकले असेल.

युगंधर ताजणे

Aamir Khan to produce a Light Hearted Comedy Drama : बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा नेहमीच त्याच्या वेगळ्या भूमिकेसाठी ओळखला जातो. त्याचा लाल सिंग चढ्ढा नावाचा चित्रपट चर्चेत आला होता. त्याला प्रेक्षकांचा जेमतेम प्रतिसाद मिळाल्यानं आमिर नाराज झाला होता. त्याला त्या चित्रपटाकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या. मात्र तो वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानं अनेक वाद समोर आले.

आमिरला लाल सिंग चढ्ढानं अनेक धडे दिले. खासकरुन मीडियासमोर बोलताना काय काळजी घ्यावी हे आमिरला कळून चुकले असेल. त्यामुळेच की काय त्याच्या लाल सिंग चढ्ढा नावाच्या चित्रपटाला प्रेक्षकांनी नाकारले होते. त्या वादाचा मोठा परिणाम चित्रपटावर झाला होता. त्याच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या अपयशाला त्याला सामोरं जावं लागल्याचे दिसून आले.

या सगळ्यात आमिर खाननं आता त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याचे नाव सितारे जमीन पर असे नाव आहे. त्याची चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. पुन्हा मोठ्या कालावधीनंतर आमिर प्रेक्षकांसमोर येणार आहे. आमिरनं आतापर्यत जे चित्रपट केले आहेत त्यातील प्रयोगशीलतेमुळे तो चर्चेत आला. त्याचे कौतुकही झाले. त्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला.

निर्माता आणि अभिनेता म्हणून त्याचा सितारे जमीन पर नावाचा प्रोजेक्ट चर्चेचा विषय आहे. त्याच्या या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री फातिमा सना शेख दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. फातिमानं यापूर्वी दंगल मध्ये आमिरसोबत काम केले होते. त्यानंतर ती बॉलीवूडमध्ये चमकली. लुडोमधील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. यासोबतच वेगवेगळ्या चित्रपटांतील तिच्या भूमिकेनं तिच्या लोकप्रियतेत वाढ झाली.

२०१६ मध्ये आमिरचा दंगल चित्रपट आला होता. त्यात फातिमानं महत्वाची भूमिका साकारली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ती आता आमिरच्या सितारे जमीन पर नावाच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे. यापूर्वी या चित्रपटामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया डिसुजा देखील काम करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.

सिक्रेट सुपरस्टारचे दिग्दर्शक अद्वैत चंदन या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. लाल सिंग नंतर आमिर पुन्हा त्याच्या सितारे जमीन पर नावाच्या चित्रपटातून समोर येणार आहे. हा चित्रपट प्रसिद्ध स्पॅनिश लोकप्रिय चित्रपट कॅम्पियोन्स चा हिंदी रिमेक असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या विमानाला आग!, प्रवाशी म्हणाले, 'असं वाटलं आज शेवटचा दिवस...', इंडिगो विमानात असं काय घडलं?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक अन् भारताच्या ऑलआऊट होऊनही २०० धावा पार; विंडीजसमोर किती धावांचं लक्ष्य?

MBBS Admission 2026: एमबीबीएस बीडीएस प्रवेश २०२६: प्रवेश निश्चित करण्यासाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत, ११ हजार ३४० विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Parner Congress: पारनेर काँग्रेसमध्ये राजीनामासत्र! तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकलेंसह संपूर्ण कार्यकारिणीचा राजीनामा, नेमकं काय कारण?

SCROLL FOR NEXT