aamir khan new video stumbled after seeing genelia deshmukh in cafe video viral  SAKAL
मनोरंजन

Aamir Khan Video: "नशेत आहेस का?" जिनिलीयाला पाहताच आमिर खानचा तोल गेला, व्हिडीओ व्हायरल

आमिर खानचा नवीन व्हिडीओ व्हायरल झालाय. यात चाहते त्याला ट्रोल करत आहेत

Devendra Jadhav

आमिर खान हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता. आमिर खानने आजवर अनेक सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. गजनी असो, 3 इडीयट्स असो की पीके आमिर खानने विविध सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.

अशातच आमिर खानचा एक व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओत आमिर खानचा नवीन लूक दिसतोय. पण जिनिलीया देशमुखला पाहताच आमिर खानचा तोल गेलाय, त्यामुळे लोकांनी त्याला चांगलंच ट्रोल केलंय. काय घडलं बघा.

जिनिलियाला पाहून आमिर खानचा तोल गेला

समोर आलेल्या नवीन व्हिडिओमध्ये आमिर खान एका कॅफेच्या गेटमधून बाहेर पडताना दिसत आहे. या गेटमधून रितेश देशमुखची पत्नी अभिनेत्री जेनेलिया डिसूजा आत जाताना दिसत आहे. जिनिलियाला आत येताना पाहताच आमिर खानचा तोल जातो आणि तो भिंतीचा आधार घेतो.

आमीर खान दारुच्या नशेत?

आमिर खानचा तोल जातो पण जिनिलिया काहीही न बोलता आत जाते. याशिवाय बाहेर येताना ती वळून उभी राहते आणि आमिरकडे पाहू लागते. आमिर हसत हसत बाहेर येतो आणि परत आत जाऊ लागतो.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकं विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. आमिर खान दारूच्या नशेत असल्याचे लोकं म्हणत आहेत. काहींनी तर अभिनेत्याला कमी दारू पिण्याची सूचना केली आहे. आमिर खानच्या विचित्र लूकवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.

आमिर खानचा नवीन लूक आणि लोकांनी केलं ट्रोल

आमिरच्या लूकबद्दल बोलायचे तर त्याने कुर्ता-पायजमा घातला असून त्याचे केस विखुरलेले आहेत. व्हिडिओमध्ये मागे उभे असलेले आशुतोष गवारीकरही दिसत आहेत. गेटवर उभे असलेले गार्ड आणि बाउन्सर त्याला आत जाण्यास सांगतात तेव्हा आमिर खान या व्हिडिओमध्ये आपली मुद्रा सुधारत आहे.

आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये आमिर खान हसत आहे, हात हलवत आहे आणि फोटो क्लिक करत आहे. आमिर खान पहिल्यांदाच अशा अवस्थेत दिसला आहे. अशा परिस्थितीत ट्रोल करणाऱ्यांना संधी मिळाली असून ते त्याला जोरदार ट्रोल करण्यात व्यस्त आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT