Aamir Khan latest News esakal
मनोरंजन

Aamir Khan : 'होय मी अंबानींच्या मुलाच्या लग्नात नाचलो कारण....' चाहत्याच्या प्रश्नावर आमिरनं दिलं उत्तर!

तू अंबानींच्या प्री वेडिंगमध्ये का नाचला असा प्रश्न चाहत्यानं आमिरला (Aamir Khan Viral Video) विचारला होता.

युगंधर ताजणे

Aamir Khan Latest News: अनंत आणि राधिका अंबानी यांच्या प्री वेडिंगची चर्चा तो सोहळा पार पडून चार दिवस उलटले तरीही सुरुच आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्या सोहळ्याची चर्चा झाली की, त्यातून बॉलीवूड (Anant Radhika Pre Wedding) सेलिब्रेटी आणि त्यांच्या परफॉर्मन्सवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या सगळ्यात आमिर खानच्या एका व्हिडिओनं पुन्हा एकदा वेगळ्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

गुजरात मधील जामनगर येथे मुकेश अंबानी यांचे लाडके चिरंजीव अनंत (Anant Radhika Pre Wedding Latest News) अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा पार पडला. त्याला जगभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित होते. सारं बॉलीवूडही या सोहळ्याला लोटलं होतं. त्यात सलमान, शाहरुख आणि आमिरनं केलेला डान्स हा चर्चेत आला आहे.

शाहरुखनं मिरवूणकीमध्येही अनंत अंबानीसोबत केलेला डान्स हा चर्चेत आला आहे. सलमान आणि अनंत अंबानीच्या डान्सचे व्हिडिओ नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा विषय आहे. तसेच आमिर खाननही अनंतच्या प्री वेडिंगमध्ये केलेला डान्स हा चाहत्यांच्या कौतुकाचा विषय आहे. येत्या काही महिन्यात आमिरचा मोठा प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी आमिरनं एका चाहत्यांशी संवाद साधला.

त्या संवादा दरम्यान आमिरला त्याच्या एका चाहत्यानं प्रश्न विचारला. तो असा की, तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नात नाचताना दिसला नाहीत पण अंबानी यांच्या प्री वेडिंगमध्ये नाचताना दिसला, असे का... आमिरनं मोठ्या चलाखीनं या प्रश्नाचे उत्तर देत चाहत्याच्या मनातील शंकेचे निरसन केले आहे. तो म्हणाला, मी माझ्या लेकीच्या लग्नात नाचलो.

अंबानी यांच्या प्री वेडिंगमध्ये मी नाचण्याचे कारण म्हणजे ते मला कुटूंबासारखे आहेत. ते माझ्या आनंदात सहभागी होतात. मी त्यांच्या आनंदात सहभागी होती. त्यांची मुलं निता अंबानी, मुकेश अंबानी हे मला एका परिवारासारखे आहेत. अशा शब्दांत आमिरनं प्रतिक्रिया दिली आहे.

मुकेशजी हे माझे जवळचे मित्र आहेत. ते मला एका कुटूंबासारखे आहेत. अशावेळी मी त्यांच्या आनंदात सहभागी होतो. आणि डान्स करतो. कारण ते देखील आमच्या कार्यक्रमांमध्ये तितक्याच आनंदानं सहभागी होतात. यावेळी आमिरनं त्याच्या सितारे जमीन पर नावाच्या चित्रपटाविषयी महत्वाचे अपडेट्स दिले आहेत. जर तुम्हाल तारे जमीन पर सारखा चित्रपट भावूक करु शकतो तर सितारे जमीन पर पाहुनही तुमची प्रतिक्रिया अशीच असेल. असेही आमिरनं यावेळी सांगितले.

आमिर, शाहरुख आणि सलमान यांनी राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्यावर डान्स करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर तीनही अभिनेते चर्चेत आले होते. त्यांनी या परफॉर्मन्ससाठी किती रुपये घेतले याचीही चर्चा सध्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC मुख्यालयात रात्रीस खेळ चाले! निवडणूक जाहीर होताच प्रशासनाचा रात्रभर 'कारभार', आचारसंहिता भंग?

विदर्भाचे दोन्ही पोट्टे IPL मध्ये चमकणार! SRH-Mumbai Indians कडून उतरणार मैदानात, विदर्भाच्या क्रिकेटचा नवा अध्याय!

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर खंडपीठाच्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

Bank Holiday : आजपासून 5 दिवस देशभरातील बँका बंद! राज्यातील बँकाही 4 दिवस बंद; कधी ते जाणून घ्या?

Pradnya Satav : प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमध्ये आज प्रवेश; नाना पटोले म्हणाले- सत्तेतील पैशांतून खरेदी सुरुय

SCROLL FOR NEXT