aamir khan son in low and ira khan boyfriend nupur shikhare nude photoshoot goes viral sakal
मनोरंजन

आमिर खानच्या जावयाचं न्यूड फोटोशूट होतंय व्हायरल! रणवीर सिंगच्याही आधी..

आमीर खानच्या जावयाची पुन्हा चर्चा! आता न्यूड फोटोमुळे उधाण..

नीलेश अडसूळ

aamir khan: सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आणि आयरा खानचा होणारा पती नुपूर शिखरेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. आमिर खानचा होणारा हा जावई आहे तरी कोण हे जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत. नुपूर शिखरे हा बॉलीवूड मधील सेलिब्रिटी नसला तरी गेल्या दोन वर्षांपासून तो चांगलाच चर्चेत आहे. कारण गेल्या दोन वर्षांपासून आमिर खानची मुलगी आयरा आणि नुपूर एकमेकांना डेट करत होते. लॉकडाऊनच्या काळात दोघेही लिवइन रिलेशनशिप मध्ये राहत होते. नुकतच नुपूरने आयराला हटके पद्धतीने प्रपोज केले. त्याने तिला रिंग घातल्याने त्यांच्या या साखरपुड्याची बरीच चर्चा झाली. पण आता सध्या तो त्यांच्या न्यूड फोटोमुळे चर्चेत आला आहे. रणवीर सिंग आधीच त्याने हे फोटोशूट केले होते पण आता ते व्हायरल होत आहेत. (aamir khan son in low and ira khan boyfriend nupur shikhare nude photoshoot goes viral)

तीन वर्षापूर्वी आमिरच्या होणाऱ्या जावयाने केलं होतं न्यूड फोटोशूट

काही दिवसांपूर्वीच अभिनेता रणवीर सिंगने न्यूड फोटोशूट केलं होतं. यामुळे तो चांगला चर्चेत आला होता. या न्यूड फोटोशूटमुळे अनेक वाद-विवाद देखील सुरू झाले होते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मात्र नुपूर शिखरेने रणवीर सिंगच्या आधी 2019 सालामध्ये म्हणजेच तीन वर्षांपूर्वी न्यूड फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटचे फोटो त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर केले होते. त्यामुळे आमिर खानचा होणारा जावई हा तर रणवीर सिंगपेक्षा देखील अव्वल निघाला असं म्हणायला हरकत नाही.

नुपूरने तीन वर्षांपूर्वी इंस्टाग्रामवर त्याचे काही न्यूड फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये तो गवतावर विवस्त्र धावताना वेगवेगळ्या हटके पोझ देताना दिसत आहे. फोटो शेअर करत त्याने एक सुंदर कॅप्शन लिहिलं होतं. "एक शिस्त म्हणून मी रनिंगचा म्हणजेच धावण्याचा पर्याय निवडला. रनिंग तुम्हाला दररोज खूप काही नवं शिकवतं. रनिंग तुम्हाला तुम्ही तुमच्या आयुष्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंत निवडलेल्या अनेक गोष्टींबद्दल खूप काही शिकवतं. त्यामुळे त्या गोष्टी विचारपूर्वक निवडा."

(nupur shikhare, amir khan daughter, ira khan, amir khan son in law, nupur shikhare ira khan engagement, nupur shikhare nude photoshoot viral)

पुढे नुपूरने लिहिलंय, "रनिंगमुळे मी तीन गोष्टी शिकलो त्या म्हणजे वचनबद्धता, शांती आणि सतत प्रयत्न करत राहणं. मग ते आपलं काम असो नातं असो किंवा कोणतीही जबाबदारी. या तीन गोष्टींचं अनुकरण करणं गरजेचं आहे. आयुष्यात आपण जे काही करतो त्यासाठी आपण वचनबद्ध असायला हवं. ती गोष्ट करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी आणि शांत राहून ती मिळण्याची प्रतीक्षा करणं गरजेचं आहे. प्रवास थोडा कठीण असला तरी तुम्हाला एक दिवशी नक्कीच यश मिळतं आणि त्यानंतर तुम्ही सर्वाधिक आनंदी असता."

नुपूर शिखरे हा एक सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आहे. दहा वर्ष तो अभिनेत्री सुश्मिता सेनचा फिटनेस ट्रेनर होता. त्यानंतर त्याने आमिर खानला ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली. याच वेळेस त्याने आमिरची लेक आयरा खानला देखील फिटनेस ट्रेनिंग देण्यास सुरुवात केली. यादरम्यान दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आयराला नैराश्यातून बाहेर आणण्यासाठी नुपूरने मदत केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे टोमणे मारणे आणि टीका करण्यापलिकडे काही करू शकत नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांचा टोला

Indian Stock Market Opening : शेअर बाजारात हिरव्या रंगात उघडला; सेन्सेक्स 330 अंकांनी वाढला; जाणून घ्या कोणते शेअर्स तेजीत?

Latest Marathi Live Update News: नाशिकमध्ये भाजपची निवडणूक जबाबदारी राहुल ढिकलेंवर

Wardha Accident: कंटेनर-कार अपघातात तीन मित्र ठार; अल्लीपूर -धोत्रा मार्गावरील एकुर्ली फाट्याजवळची घटना

India vs Australia 4th T20: आता शुभमन गिलच्या फॉर्मची प्रतीक्षा; भारत-ऑस्ट्रेलिया आज चौथा टी-२० सामना, आघाडीसाठी प्रयत्न

SCROLL FOR NEXT