KGF3 VS LALSINGLADDHA
KGF3 VS LALSINGLADDHA SAKAL
मनोरंजन

KGF2चे रेकॉर्ड आमीरचा 'लाल सिंग चड्ढा' मोडणार? जाणून घ्या 5 कारणं

सकाळ डिजिटल टीम

आमिर खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'लाल सिंग चड्ढा' यावर्षी 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. असे म्हटले जात आहे की बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत हा चित्रपट KGF3 लाही मागे सोडू शकतो. आज आपण जाणून घेणार आहोत की असा दावा करण्यामागे काय कारणं आहेत? खरंतर आमिर खानचा (Aamir Khan) शेवटचा चित्रपट 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' फ्लॉप ठरला होता, त्यानंतर लाल सिंह चड्ढाकडून (Lal Singh Chaddha) लोकांना खूप आशा आहेत.

1. आमिर खानचा चित्रपट खूप दिवसांनी येतोय

चित्रपट हिट होऊ शकतो यामागचे पहिले मोठे कारण म्हणजे खूप दिवसांच्या गॅपनंतर आमिर खानने त्याच्या चाहत्यांसाठी चित्रपट घेऊन येत आहे. त्यामुळे साहजिकच त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ठग्स ऑफ हिंदोस्तान 2018 साली रिलीज झाला आणि तेव्हापासून आमिर खानचा एकही चित्रपट आलेला नाही. अशा परिस्थितीत आमिरचा हा चित्रपट चाहते डोक्यावर घेऊ शकतात.

2. आमिर आणि करीनाची सुपरहिट जोडी

आमिर खान आणि करीना कपूर (Kareena Kapoor) याआधी '3 इडियट्स' चित्रपटात एकत्र दिसले होते. या जोडीला चाहते किती पसंत करतात याची प्रचिती 'तलाश' चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान दुसऱ्यांदा पाहायला मिळाली. त्यामुळे यावेळीसुद्धा चाहते तसाच प्रतिसाद देतील, अशी शक्यता असून तिकीटांची जोरदार विक्री होऊ शकतो असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त होत आहे.

3. 'लाल सिंग चड्ढा' आहे ट्राय आणि टेस्टेड फॉर्म्युला

आमिर खानने 'ठग्स ऑफ हिंदुस्तान' आपटल्यानंतर नवीन कथेऐवजी रिमेकचा पर्याय निवडला आहे. 'लाल सिंग चड्ढा' हा हॉलीवूडचा सुपरहिट चित्रपट फॉरेस्ट गंपचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट जगभर गाजला. याशिवाय हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, त्यामुळे तिकीट अधिक विकले जाऊ शकतात.

4. चित्रपटाची रिलीज डेट आहे खूप खास

आमिर खानने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अतिशय काळजीपूर्वक निवडली आहे. बराच काळ पुढे ढकलल्यानंतर त्यांनी हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चित्रपटाला लाँग वीकेंड मिळणार असून सुट्टीमुळे जास्तीत जास्त लोक चित्रपटगृहात जाऊन चित्रपटाचा आनंद लुटू शकतील.

5. खान त्रिकुटाची ताकद लागणार?

निर्मात्यांनी अद्याप याची पुष्टी केली नसली तरी, असा दावा केला जात आहे की 'लाल सिंग चड्ढा'मध्ये आमिर खानसोबत सलमान खान आणि शाहरुख खान देखील काही सीक्वेन्स करताना दिसतील. असे झाल्यास चाहत्यांच्या संख्येच्या तुलनेत चित्रपटाला तिप्पट ताकद मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

International Firefighters' Day 2024: एक दिवस खऱ्या सुपरहीरोंसाठी! आज साजरा केला जातो 'फायर फायटर डे'; कशी झाली सुरूवात?

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SCROLL FOR NEXT