Akshay Kumar And Twinkle Khanna with Son Aarav Instagram
मनोरंजन

Bollywood: बापाचे सिनेमे चालेनात पण पोरगा करणार बॉलीवूड डेब्यू?,सध्या काय करतोय 20 वर्षीय आरव अक्षय कुमार

अक्षय कुमारचा मुलगा लाइमलाइटपासून दूर असला तरी चर्चेत मात्र असतो..नुकतंच खिलाडी कुमारनं आपल्या मुलाच्या फ्युचर प्लॅनिंगविषयी खुलासा केला आहे.

प्रणाली मोरे

Aarav Akshay Kumar: बॉलीवूड स्टार्सची मूलं म्हणजे स्टार किड्स..जे आपल्या आई-बापाप्रमाणेच कायम चर्चेत असलेले पहायला मिळतात. या स्टार किड्सपैकी अनेकजण अभिनयाच्या दुनियेत आपलं नशीब आजमावतात. यामध्ये जान्हवी कपूर, सारा अली खान, अनन्या पांडे याच्यासहित इतरही स्टार किड्स सामिल आहेत.

अक्षय कुमारनं सुरवातीला आपला मुलगा आरवच्या स्वप्नांविषयी.. त्यांना फॉलो करण्याविषयी काही गोष्टी बोलून दाखवल्या होत्या,पण आता त्यानं मुलाच्या बॉलीवूड करिअरवर मोकळेपणाने भाष्य केलं आहे.

चला जाणून घेऊया वडीलांप्रमाणेच आरवही मोठ्या पडद्यावर लवकरच दिसणार का?(Aarav Akshay Kumar bollywood debut..read inside story)

अक्षय कुमारला जेव्हा विचारलं गेलं की तुमचा मुलगा आरव दुसऱ्या स्टारकिड्स प्रमाणे फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री करणार का? यावर त्यानं उत्तर दिलं की त्याला बॉलीवूडमध्ये करिअर करण्याची आवड नाही. आणि स्वतः अक्षय म्हणाला की मलाच नाही वाटत की माझ्या मुलानं माझा वारसा पुढे चालवावा..मला फक्त वाटतं तो जे काही करेल त्यात त्यानं खूश रहावं.

आरव भाटिया विषयी बोलायचं झालं तर तो सध्या २० वर्षांचा आहे. त्याचा जन्म १५ सप्टेंबर २००२ मध्ये झाला होता. त्याला स्पोर्ट्स मध्ये जास्त इंट्रेस्ट आहे. त्यानं शालेय शिक्षण मुंबईतच पूर्ण केलं आहे. सध्या तो सिंगापूरमध्ये त्याचं पुढचं शिक्षण घेत आहे. त्याच्या छोट्या बहिणीचं नाव नितारा आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार आरवनं वयाच्या चौथ्या वर्षी मार्शल आर्टचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्याच्या वडीलांमुळे त्याला यात आवड निर्माण झाली. त्यानं Okinawa, Kudo आणि Goju Ryu Karate मध्ये ब्लॅक बेल्ट जिंकला आहे आणि जूडो नॅशनल चॅंपियनशीपमध्ये गोल्ड मेडल जिंकलं आहे.

जेव्हा आरव ७ वर्षांचा होता, तेव्हा 'ग्रीन ग्लोब फॉर आऊटस्टॅंडिंग कॉन्ट्रिब्युशन बाय ए चाइल्ड' चा पुरस्कार मिळाला होता. तो 'लाइट ए बिलियन लाइव्ह' कॅंपेन अंतर्गत गावांना स्पॉन्सर करणारा पहिला यंगस्टर ठरला होता.

आरव स्टार किड असल्यामुळे नेहमीच चर्चेत असलेला पहायला मिळतो. अक्षयने आपल्या पाठीवर आपल्या मुलाच्या नावाचा टॅटू काढला आहे. आरव मागे एका वादामुळे चर्चेतही आलेला पहायला मिळाला होता. बोललं जातं की, एकदा तो रुमर्ड गर्लफ्रेंड आणि मित्रांसोबत मद्यधुंद अवस्थेत स्पॉट केला गेला होता. त्याच्यासोबत सोहल खानचा मुलगा निर्वाण देखील होता. आरवचा एक फोटो व्हायरल झाला होता,ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी लाडाने त्यांचे कान ओढत आहेत.

सध्या अक्षयलाही बॉक्सऑफिस साथ देताना दिसत नाहीय. नुकताच रिलीज झालेल्या त्याच्या 'सेल्फी' सिनेमाला देखील लोकांनी नावं ठेवली आहेत. तर त्याआधी रिलीज झालेले त्याचे 'रामसेतू','कठपुतली','रक्षाबंधन','सम्राट पृथ्वीराज','बच्चन पांडे' ,'अतरंगी रे' या सिनेमांनी देखील बॉक्सऑफिसवर काही दिवसांतच मान टाकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT