Palak-Mithoon Wedding esakal
मनोरंजन

Palak-Mithoon Wedding: 'मेरी आशिकी तुम हो' सिंगर पलक-मिथुनचं ठरलं!

बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायिका पलक मुच्चलची गोड बातमी समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Aashiqui 2 bollywood singer Palak Mucchal marry: बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायिका पलक मुच्चलची गोड बातमी समोर आली आहे. ती म्हणजे येत्या महिन्यात ती प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर मिथुनसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते एकमेकांना डेट करत होते. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे उलट सुलट चर्चेला उधाण आले होते.

अखेर आशिकी फेम सिंगर पलक आणि मिथुन लग्न करणार असल्याच्या बातमीनं नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. नोव्हेंबर महिन्यातील पहिल्याच आठवड्यात ते दोघे लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची माहिती ई टाईम्सनं दिली आहे. 2013 मध्ये आलेल्या आशिकी 2 मध्ये पलकनं डेब्यु केलं होतं. त्या चित्रपटानं तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेलं. अजुनही त्या चित्रपटातील गाणी चाहत्यांचा आवडीची आहे. आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूरच्या आशिकी 2 मध्ये मुख्य भूमिका होत्या.

चाहु मैं या ना आणि मेरी आशिकी ही दोन गाणी पलकनं गायली होती. त्याला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. तर 2016 पासून मिथुन आणि पलक हे एकत्र काम करत आहेत. त्यांनी ट्रफिक चित्रपटातील गाणी कंपोझ केली. पलकनं ती गायली. पलक आणि मिथुनच्या डेटिंगच्या बातमीनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. अखेर त्यांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. त्यामुळे चाहत्यांनी त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडणार असून त्याला बॉलीवूडचा भाईजान सलमान खान उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय बॉलीवूडमधील इतरही सेलिब्रेटी हजेरी लावणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पलक आणि मिथुनच्या लग्नाची चर्चा रंगली होती. अखेर त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 176 अंकांनी घसरणीसह बंद; मेटल आणि आयटीमध्ये जोरदार विक्री, कोणते शेअर्स वाढले?

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराह IN, मग कोण OUT? लॉर्ड्स कसोटीसाठी इरफान पठाणने निवडली Playing XI; अशीच असेल टीम इंडिया

Arvind Kejriwal : ट्रम्प सोडा आता केजरीवालांना सुद्धा हवा नोबेल पुरस्कार! गाजणारा दावा सोशल मीडियावर चर्चेत

EMI Debt Trap: मध्यमवर्ग ईएमआयच्या जाळ्यात; 5 पैकी 3 लोकांवर तीनपेक्षा जास्त कर्ज, काय आहे कारण?

Latest Maharashtra News Live Updates: पुण्यात मटण पार्टीसाठी दुकान फोडले मात्र एक चूक आणि चौघे पोलिसांना सापडले

SCROLL FOR NEXT