Aatmapamphlet Marathi Movie Director Ashish Bende post  Esakal
मनोरंजन

Aatmapamphlet Marathi Movie: 'आम्ही कमी पडलो...' आत्मपॅफ्लेटच्या दिग्दर्शकाने व्यक्त केली खंत! पोस्ट व्हायरल

Vaishali Patil

Aatmapamphlet Marathi Movie Director Ashish Bende post: अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजला गेलेला आत्मपॅम्फ्लेट सिनेमा 6 ऑक्टोबरला सिनेमा सर्वत्र प्रदर्शित झाला आहे.

मराठी मनोरंजन विश्वात आत्मपॅफ्लेट सिनेमाची बरीच चर्चा आहे. ज्यानी कोणी हा सिनेमा पाहिला ते स्वत:ला या सिनेमाचं कौतुक करण्यापासून रोखू शकले नाही. सगळीकडे चित्रपटाचं आणि चित्रपटाच्या टिमचं कोतुक होत आहे.

इतकच नाही तर संपूर्ण मराठी इंडस्ट्री आत्मपॅम्फ्लेट सिनेमा आपल्या चाहत्यांना एकदा तरी पाहण्याचे आवाहन करत आहेत.

मात्र एकीकडे चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं आणि चित्रपटाच्या कथानकाचं कौतुक होत असताना प्रेक्षकांचा मात्र या सिनेमाला खुप कमी प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी आवाहन करुनही हा सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहात खुपच कमी प्रेश्रक वर्ग दिसत आहे.

अशातच आत्मपॅम्फ्लेट या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष बेंडेने प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल एक पोस्ट सोशल मिडियावर शेयर केली आहे. या पोस्टमध्ये आशिष बेंडे लिहितो की, "विकडेजला भरघोस प्रतिसाद मिळू शकेल असे शोज मिळाले आहेत.

असो, जोक्स अपार्ट, यात थिएटर्स किंवा प्रेक्षक यांचा कोणाचाच दोष नाही. अगदी 1000%.

आम्हीच सगळे प्रेक्षकांपर्यंत सिनेमा पोहोचवायला कमी पडलो. शेवटी मराठी सिनेमा आणि त्याचं मार्केटिंग आणि पब्लिसिटीचं एक बजेट ठरलेलं असतं. त्या अंथरुणाच्या बाहेर पाय पसरता येत नाहीत.

तर ज्या ज्या प्रेक्षकांना हा सिनेमा बघायची इच्छा असेल त्यांनी बुधवारच्या आत हा सिनेमा बघावा असं मी आवाहन करतो. कारण गुरुवार किंवा शुक्रवारी सिनेमा उतरेल असा माझा अंदाज आहे. त्यामुळे विकेंड पर्यंत थांबून मग बघुयात असा विचार करत असाल तर कदाचित भ्रमनिरास होऊ शकतो.

बाकी ज्या ज्या प्रेक्षकांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे, प्रेम दिलं आहे त्यांचे मनःपूर्वक आभार"

जर चित्रपटाला प्रेक्षकांचा कमी प्रतिसाद असला तर चित्रपटगृहाचे मालक तो सिनेमा बंद करतात आता याचीच चिंता आशिष बेंडेला सतावत आहे.

आत्मपॅम्फलेट या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ओम बेंडखळे, प्रांजली मुडे आणि केतकी सराफ यांचा प्रमुख भुमिका या चित्रपटात आहेत.

परेश मोकाशी हे या चित्रपटाचे लेखक आहे तर आशिष बेंडेने सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात आशिषची कथा सांगण्यात आली आहे. अनेक गंभीर मुद्यावर अतिशय मार्मिकपणे हा सिनेमा भाष्य करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT