Actress Abhidnya Bhave with Husband Mehul Pai Google
मनोरंजन

'कसा आहे मेहूल?' कर्करोग झालेल्या पतीविषयी विचारताच अभिज्ञा भावे भावूक

अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि मेहूल पै यांचं लग्न जानेवारी २०२१ मध्ये झालं होतं.

प्रणाली मोरे

खलनायिका म्हणून मराठी मालिकांमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय पहायला मिळते. ती अनेकदा लाइव्ह चॅटच्या माध्यमातूनही आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. पण गेल्या काही दिवसांत अभिज्ञानाला एका दिव्यातनं जावं लागत आहे. नवीन नवीन लग्न झाल्यानंतर सुखाचे दिवस अनुभवताना अचानक अभिज्ञावर दुःखाचा डोंगर कोसळला ते नवरा मेहूलला कर्करोगाचं निदान झाल्यानंतर. मेहूल पै ने तशी माहिती त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरनं दिली होती. त्यावेळी त्यानं अभिज्ञासोबतचे रुग्णालयातील काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. अभिज्ञाच्या चाहत्यांसाठी मात्र ही बातमी मोठा धक्का देणारी होती. अभिज्ञा या कारणामुळेच गेली अनेक दिवस सोशल मीडियापासून अंतर ठेवताना देखील दिसली. पण आता एका लाइव्ह चॅटच्या माध्यमातून तिनं आपल्या चाहत्यांशी संवाद साधला आहे. तेव्हा अचानक एका चाहतीनं मेहूलचा विषय छेडला अन् अभिज्ञा आपल्या भावनांना आवरु शकली नाही.

अभिज्ञा सध्या झी मराठी वाहिनीवरील 'तू तेव्हा तशी' या मालिकेत खलनायिकी पात्र रंगवाताना दिसत आहे. यात ती स्वप्निल जोशीच्या वहिनीची भूमिका साकारताना दिसत आहे. ती अनेक दिवसांनी छोट्या पडद्यावर परत आली आहे. याच मालकेतील तिची 'पुष्पवल्ली' ही भूमिका खलनायकी असली तरी त्याला एक विनोदाची छटा ही अधनं-मधनं दिलेली दिसतेय. अभिज्ञाचं हे पात्र आता लोकांना आवडू लागलं आहे. कधी राग देणारं तिचं हे पात्र नकळत त्याच्या वागण्यातनं प्रेक्षकांना हसवतानाही दिसत आहे. अभिज्ञानं प्रेक्षकांशी लाइव्ह चॅट दरम्यान संवाद साधला तो याच मालिकेच्या सेटवरुन. ती चाहत्यांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर देत होती इतक्यात एका चाहतीनं मेहूलचा विषय छेडला अन् अभिज्ञाला भावना अनावर झाल्या. पण मोठ्या धैर्यानं या सगळ्याला तोंड देणारी अभिज्ञानं सांगितलं की,मेहूल पुढील दोन महिन्यात बरा होऊन पुन्हा सामान्य आयुष्य जगू शकेल. यामुळे अभिज्ञाच्या चाहत्यांना मात्र खूप बरं वाटलं आहे ते तिला लाइव्ह चॅट दरम्यान मिळालेल्या प्रतिक्रिया वाचून कळत आहे.

अभिज्ञा भावे आणि मेहूल पै यांनी जानेवारी २०२१ रोजी लग्न केलं होतं. अभिज्ञाचं हे लव्ह मॅरेज आहे. लग्नाला एक वर्ष होत नाही तोवरच मेहूलला कर्करोगासारख्या गंभीर आजाराचं निधन झालं. पण या सगळ्या संकटाचा सामना करत अभिज्ञा मेहूलला साथ देऊन यातून सावरत आहे. अभिज्ञा अभिनेत्रीच नाही तर तेजस्वी पंडितसोबत मिळून तिचा साड्यांचा तेजाज्ञा हा ब्रॅंड देखील लीड करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT