abhijeet kelkar Joined bjp bhartiya janta party with priya berde and Chandrashekhar Bawankule
abhijeet kelkar Joined bjp bhartiya janta party with priya berde and Chandrashekhar Bawankule  SAKAL
मनोरंजन

Abhijeet Kelkar: "किती काळ नावं ठेवायची?" म्हणत अभिनेता अभिजीत केळकरचा भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश

Devendra Jadhav

Abhijeet Kelkar BJP Entry: मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, काकस्पर्श अशा लोकप्रिय सिनेमांंमध्ये काम करणारा सुप्रसिद्ध मराठमोळा अभिनेता अभिजीत केळकरने भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केलाय. अभिनेत्री प्रिया बेर्डे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत अभिजीतने भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केलाय.

(abhijeet kelkar Joined bjp bhartiya janta party with priya berde and Chandrashekhar Bawankule)

अभिजीत केळकरची भारतीय जनता पार्टीत प्रवेश करताना पहिली प्रतिक्रिया

अभिजीतने आज रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर ही खास बातमी सर्वांसोबत शेअर केली. अभिजीतने शेअर केलेल्या फोटोत त्याच्यासोबत अभिनेत्री प्रिया बेर्डे दिसत आहेत. याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष अभिजीतचं पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत करताना दिसत आहेत

"भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश As they say, you have to be in the system to change it... ... किती काळ काठावर उभं राहून, नावं ठेवायची? त्या प्रवाहात सामिल होऊन, समजून घेऊन, काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया", अशी पोस्ट करत अभिजीतने त्याच्या भावना व्यक्त केल्यात

अभिजीतचं सामाजिक भान

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेता अभिजीत केळकर हा नेहमीच चर्चेत असतो. मनोरंजन विश्वात त्याने त्याच्या अभिनयाची छाप सोडली आहे. अनेक मालिका आणि चित्रपटांमधून अभिजीतने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

मराठी मनोरंजन विश्वात सक्रिय असलेला अभिजीत हा सोशल मीडियावर देखील कमालिचा सक्रिय आहे. त्याच्या चाहत्यांची संख्याही काही कमी नाहीच. तो अनेकदा बऱ्याच गंभीर मुद्यावर भाष्य करत असतो. त्याच्या पोस्टही व्हायरल होतात. त्याच्या सोशल मीडिया पोस्टही अनेकदा चर्चेत असतात.

आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करुन अभिजीत कसं काम करणार, याकडे त्याच्या फॅनचं लक्ष असेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Punjab Train Accident: दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक! ट्रेन चालक गंभीर जखमी, प्रवासी गाडीही अडकली; नेमकं काय घडलं?

Lok Sabha Exit Poll: पुढच्या वेळी जेव्हा निवडणुका... एक्झिट पोल येताच प्रशांत किशोर यांचे खळबळजनक ट्विट

Hardik Pandya : 6,6,6... जलवा है हमारा! मुंबईच्या चाहत्यांची हार्दिक पांड्याने केली बोलती बंद; ठोकल्या इतक्या धावा

Kolhapur Exit Poll Results : 'एक्झिट पोल'मुळे उत्सुकता शिगेला; लोकसभा निकालावर ठरणार जिल्ह्याचं राजकीय समीकरण

Pune Porsche Accident: "मी नशेत होतो, मला काहीच आठवत नाही," पोर्शे अपघातातील अल्पवयीन आरोपीने पुणे पोलिसांनना काय काय सांगितले?

SCROLL FOR NEXT