मनोरंजन

अभिषेक बच्चनची वेब विश्वात धमाकेदार एन्ट्री

सकाळ वृत्तसेवा


मुंबई ः रेफ्युजी या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता अभिषेक बच्चन. या चित्रपटानंतर अभिषेकने बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. बंटी और बबली, युवा, धूम, दोस्ताना, दिल्ली ६ असे काही त्याचे उल्लेखनीय चित्रपट आहेत. गेली वीसेक वर्षे तो या इंडस्ट्रीत आहे आणि त्याने विविध भूमिका साकारल्या आहेत. आता अभिषेक वेबविश्वात पदार्पण करीत आहे. अमेझॉन प्राईम व्हिडिओच्या आगामी सायकाॅलॉजिकल क्राईम थ्रिलर 'ब्रीद: इन द शैडोज़' या वेबसीरीजमध्ये तो काम करीत आहे.

ही वेबसीरीज अबुंदंतिया एंटरटेनमेंटद्वारे निर्मित आणि मयंक शर्मा द्वारा दिग्दर्शित करण्यात आली आहे.  ही सिरीज भवानी अय्यर, विक्रम तुली, अरशद सैयद आणि मयंक शर्मा यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने लिहिली आहे.  यामध्ये दाक्षिणात्य अभिनेत्री निथ्या मेनन देखील आपला डिजिटल डेब्यू करणार आहे. अमित साद याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. कबीर सावंत या पोलिस अधिकाऱ्याची भूमिका तो साकारीत आहे. अभिनेत्री सयामी खेर हीदेखील यामध्ये काम करीत आहे. तब्बल दोनशे देशांमध्ये ही वेबसीरीज प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Summer Holiday : शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी; नवीन शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून

'चुकीच्या घरात जाता जाता वाचले' अभिनेत्री रुचिरा जाधव ब्रेकअपबद्दल म्हणाली...'विठ्ठलाकडे साकडं घातलं आणि दोन दिवसात सत्य...'

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची आज SIT चौकशी होणार?

Maharashtra Weather: राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा, मुंबईकर हैराण; उष्माघाताच्या घटनांतही वाढ

बाबो! मार्केटमध्ये खरंच 'प्रोटीन कंडोम' आलंय? नक्की हे आहे तरी काय? Flying Beast खरंच सीरियस की घेतोय मजा, Viral

SCROLL FOR NEXT