Abhishek Bachchan gets angry after making fun of father amitabh bachchan, he walks out of 'case toh banta hai' a comedy show  Instagram
मनोरंजन

Viral Video: वडीलांचा अपमान सहन नाही झाला अभिषेक बच्चनला, शो मधनं तडक उठून निघून गेला...

एका कॉमेडी शो मध्ये अभिषेक गेला असताना अमिताभ बच्चन यांना उगाचच मध्ये आणत त्यांची खिल्ली उडवल्याने अभिनेता नाराज झाल्याचे कळत आहे.

प्रणाली मोरे

Abhishek Bachchan: अभिनेता अभिषेक बच्चनला आपल्या कुटंबाचा अभिमान आहे ही गोष्ट आता काही लपून राहिलेली नाही. तो नेहमीच आपल्या कुटुंबाप्रती खूपच प्रोटेक्टिव्हही वाटत आलाय. मग ते प्रोटेक्टिव्ह राहणं आराध्या प्रती असो की वडील अमिताभ बच्चन यांच्या प्रती. तो आपल्या कुटुंबाच्या विरोधात एक शब्द ऐकून घेताना दिसत नाही. याचं एक ज्वलंत उदाहरण नुकतच पहाण्यात आलं. एका कॉमेडी शो मध्ये अभिषेक गेला असताना त्याच्या वडीलांना म्हणजेच अमिताभ बच्चन यांना उगाचच मध्ये आणत त्यांची खिल्ली उडवल्याने अभिनेता भलताच नाराज झाला. प्रकरण इतकं वाढलं की अभिषेक शो अर्धवट सोडून निघून गेला. यासंदर्भातला व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये नेमकं प्रकरण काय आहे ते कळतंय.(Abhishek Bachchan gets angry after making fun of father amitabh bachchan, he walks out of 'case toh banta hai' a comedy show)

रितेश देशमुख,कुशा कपिला आणि परितोष त्रिपाठी यांच्या 'केस तो बनता है' चा एक प्रोमो समोर आला आहे. या शो मध्ये अभिषेक बच्चनला गेस्ट म्हणून पाचारण करण्यात आलं होतं. कॉमेडीनं भारलेल्या या कोर्टात अभिषेक बच्चन आपल्याला कोर्टातील फिर्यादी कक्षात बसलेला दिसतोय. तर रितेश देशमुख स्टेजवर दिसत आहे. सगळं व्यवस्थित सुरु असतं इतक्यात ज्युनिअर बच्चनच्या वडीलांवर म्हणजे अमिताभ यांच्यावर जोक केला जातो आणि अभिनेता नाराज होतो.

विनोदवीर परितोष त्रिपाठी अभिषेक बच्चन समोर महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर विनोद करण्याची मोठी चूक करतो. आणि ते ऐकल्यावर कोणत्या मुलाला राग येणार नाही. अभिषेकही नाराज झालाच. तो यासंदर्भात रितेशशी बोलतो आणि शो च्या मेकर्सला देखील तावातावाने बोलावतो. तो म्हणताना दिसतोय,''कॉमेडीच्या नावावर काहीही सुरू आहे. ते माझे वडील आहेत,आणि मी त्यांच्या विरोधात काहीच ऐकणार नाही''.

अभिषेक बच्चन यासंदर्भात जाहीररित्या आपली नाराजगी व्यक्त करतो. ''तुम्ही मला इथे शो मध्ये सहभागी करुन घेतलंय पण माझ्या आई-वडीलांना यात आणणं मला आवडलं नाही. ते माझे वडील आहेत आणि मी त्यांच्या प्रती खूपच हळवा आहे. कॉमेडीच्या नावाखाली ही अशा प्रकारची मस्करी मी खपवून घेणार नाही. आपण मर्यादा पाळलीच पाहिजे. आणि आदर करायला शिका. अभिषेक एवढा नाराज झाला की 'केस तो बनता है' च्या सेटवरनं निघूनच गेला. आणि घटनेनंतर शूटही थांबवावं लागलं''.

सोशल मीडियावर या प्रोमोची जोरदार हवा आहे. काहींनी याला प्रॅंक म्हटलंय तर काहींना हे अभिषेकचं रागावणं खरं वाटलंय. तर दुसरीकडे या व्हिडीओला ट्रोलही केलं जातंय. बोललं जातंय की शो च्या प्रसिद्धिसाठी काहीही करतील हे लोक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SLW T20I: स्मृती मानधनाने रचला नवा विश्वविक्रम, शफाली वर्माचीही मिळाली साथ; भारताचा श्रीलंकेविरुद्ध विजयाचा चौकार

Pune Municipal Election : पुण्यात मोठा ट्विस्ट! मनपा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार? उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

RPI Protest : जागावाटपावरून रिपाइंची नाराजी; भाजप कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

१११ वर्षांनंतर विदर्भातील पहिला मानाचा पट पुन्हा सुरू, विदर्भ केशरी शंकरपट मैदानाची धावपट्टी गाजणार

SCROLL FOR NEXT