Abhishek Bachchan pulls in Aishwarya Rai for tight hug as his kabaddi team wins  sakal
मनोरंजन

Abhishek bachchan kabaddi: भर मैदानात अभिषेकनं ऐश्वर्याला मारली कडकडून मिठी.. कारण..

अभिषेक बच्चनची टीम प्रो कबड्डीमध्ये जिंकल्याने त्याने संपूर्ण कुटुंबासोबत आनंद साजरा केला.

नीलेश अडसूळ

Abhishekh bachchan: कालपासून बॉलीवुड अभिनेता अभिषेक बच्चन चांगलाच चर्चेत आहे. त्याचे कारणही खास आहे. सध्या 'प्रो कबड्डी'चे वारे वाहत होते आणि त्यात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचीही टीम सहभागी झाली होती. काल झालेल्या महाअंतिम सोहळ्यात अभिषेक आणि ऐश्वर्याच्या टीमने म्हणजे 'जयपूर पिंक पॅंथर'ने मोठा विजय मिळवला. यावेळी जेतेपद मिळवल्याने अभिषेकचा आनंद गगनात मावेनासा झाला. यावेळी त्याने आनंदाच्या भरात भर मैदानातच ऐश्वर्याला कडकडून मिठी मारली..

(Abhishek Bachchan pulls in Aishwarya Rai for tight hug as his kabaddi team wins )

शनिवारी प्रो-कबड्डी लीगमध्ये जयपूर पिंक पँथर्स या त्यांच्या संघाने ट्रॉफी जिंकल्यानंतर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अभिषेक तर आनंदाने नाचू लागला. यावेळी दोघांनी अनेक फोटो काढले आणि ते शेयर ही केले. अभिषेक या सामान्याला ऐश्वर्या, भाजी नव्या नवेली नंदा आणि लेक आराध्याला घेऊन आला होता. ते सर्व मिळून जयपूरच्या टीमला चीयर करत होते. त्यांचा संघ विजेता घोषित झाल्यानंतर मोठा जल्लोष करण्यात आला.

ऐश्वर्या राय बच्चनने एक आनंदाची पोस्ट शेअर केली आहे. "जयपूर पिंक पँथर्स प्रो कबड्डी सीझन 9 चे चॅम्पियन्स आहेत. किती शानदार सीझन होता! आम्हाला आमच्या प्रतिभावान आणि मेहनती खेळाडूंचा खूप अभिमान आहे... थॅंक्स बॉइज... देव तुम्हाला आशीर्वाद, प्रेम, प्रकाश आणि खूप ताकद देवो असेच चमकत रहा" असे ऐश्वर्या म्हंटली आहे.

अभिषेकनेही आपल्या टीमसोबत अनेक फोटो पोस्ट केले आहेत, त्याने लिहिले आहे की, 'मला संघाचा अभिमान आहे.. त्यांनी या चषकासाठी अत्यंत शानदार काम केले. टीका होऊनही त्यांनी कठोर परिश्रम घेतले आणि विश्वास सोडला नाही. हा संघ संपला असेच प्रत्येकाला वाटत होते पण आम्ही हार मानली नाही. स्वतःवर विश्वास ठेवून खेळत राहणे हाच मार्ग आहे..' असे तो म्हणाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पुन्हा मुर्खपणा! ICC च्या ई मेलला अर्धवट उत्तर अन् विचारला उलट प्रश्न...

Banana Buns for Evening Snacks: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट! घरच्या घरीच बनवा बनाना बन्स

Uttar Pradesh : विश्वकर्मा योजनेत समाविष्ट झाले १२ नवीन ट्रेड्स, CM योगी म्हणाले UP आता विकासाचे ग्रोथ इंजिन होणार

‘या अली’ गाण्याचे गायक जुबिन गर्गचं निधन, सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान मृत्यू, संगीतविश्वाला मोठा धक्का!

Latest Marathi News Updates : राजापूर येथे बस थांबवून विद्यार्थांचं आंदोलन

SCROLL FOR NEXT