Abhishek Bachchan, Aishwarya Rai-Bachchan
Abhishek Bachchan, Aishwarya Rai-Bachchan Google
मनोरंजन

'ऐश्वर्या नसेल तर जेवण मिळणं मुश्किल' असं का म्हणाला अभिषेक बच्चन?

प्रणाली मोरे

अभिषेक बच्चनचा(Abhishek Bachchan) 'दसवी' (Dasvi) सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. या निमित्तानं अनेक मुलाखती दिल्या,त्यावेळी तो ऐश्वर्या(Aishwarya Rai-bachchan) विषयी देखील भरभरुन बोलला आहे. आपल्या लाजाळू स्वभावामुळे आपण अनेकदा अनोळखी माणसांशी पटकन बोलत नाही किंवा आपल्याला बोलणं जमत नाही तेव्हा आपण कसे ऐश्वर्याला पुढं करतो याविषयी सांगताना त्यानं हॉटेलमधील एक किस्सा सांगितला आहे. तो म्हणाला आहे,''हॉटेलमध्ये गेल्यावर मी जर तिथे वास्तव्यास असेल तर रुम सर्व्हिसला जेवणाची ऑर्डर कधीच फोनवर देत नाही. कारण मला ते जमत नाही. तेव्हा मी ते काम ऐश्वर्याला सांगतो. मग ती फोन करुन माझ्यासाठी ऑर्डर देते. जर ते शक्य झालं नाही काही कारणानं तर जेवतही नाही'' असं चक्क अभिषेक म्हणाला आहे.

अभिषेकनं याविषयी विस्तारितपणे सांगताना सांगितलं की, माझा स्वभाव थोडो लाजाळू आहे. खासकरुन जेव्हा अनोळखी माणसांशी संवाद साधायचा असेल तर मला ही अडचण अधिक सतावते. मी कधीच हॉटेलमध्ये रुम सर्व्हिसशी संवाद साधत नाही असंही तो म्हणाला. तो म्हणाला एखाद्या सिनेमाच्या प्रमोशनल कार्यक्रमावेळी कोणी स्वतःहून मला गाइड नाही केलं कुठे,कसं जायचंय याविषयी तर मी स्वतःहून जातही नाही विचारायला. का तर माझा हा लाजाळू स्वभाव. अभिषेक पुढे म्हणाला,सेटवरही वातावरण आनंदी नसेल,काही घडलं असेल तर मी सकारात्मक वातावरणाशिवाय कामही करु शकत नाही. मी खूप लाजाळू आहे. लोक यामुळे हसतात कधीकधी माझ्यावर. माझ्या सिनेमाच्या प्रमोशनचा कार्यक्रम असेल आणि तिथे माझ्या मदतीला जर कुणी नसेल तर मी काहीच करु शकत नाही. मला माझ्या अवतीभवती माणसं लागतात,जे मला मार्गदर्शन करतील.

''एकदा घरी गेल्यावर मी आणि ऐश्वर्या सहज बोलत बसलो होतो. ती मला माझा दिवस कसा गेला याविषयी विचारत होती. तेव्हा तिनं 'मी जेवलो का?' अशी चौकशी केली. तेव्हा मी नाही म्हणालो. तेव्हा तिनं मला खायला आणून दिलं आणि मी जेवलो. मी स्वतःहून रुम सर्व्हिसला कधीच फोन करत नाही,हे काम ऐश्वर्या करते,ती माझ्यासाठी जेवण ऑर्डर करते आणि मी जेवतो. मला अनोळखी माणसांसोबत प्रत्यक्ष आणि फोनवरही बोलता येत नाही'' असं अभिषेक म्हणाला. अभिषेकचा 'दसवी' सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमात यामी गौतम,निमरत कौर असे कलाकार आहेत. ७ एप्रिल रोजी हा सिनेमा थिएटर आणि ओटीटी अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT