Abhishek bachchan shares about self imposed no intimate scene policy 
मनोरंजन

तर यामुळे अभिषेक बच्चन चित्रपटात इंटिमेट सीन देणे टाळतो.. वाचा..

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: अभिनेता अभिषेक बच्चन हा लवकरच ओटीटी माध्यमावर प्रदर्शित होणाऱ्या ब्रीदः इनटू द शॅडोज या वेब सिरीजच्या माध्यमातून डिजीटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. अभिषेकने त्याच्या पहिल्या वेब सिरीजचे पहिले पोस्टर नुकतेच प्रसिध्द केले आहे. यादरम्यान त्याने पत्रकार राजीव मसांद यांना दिलेल्या मुलाखतीत चित्रपटांमध्ये बोल्ड सीन न करण्यामागच्या कारणांचा खुलासा केला आहे. 

एका मासिकाने दिलेल्या बातमीनुसार अभिषेकला वडिल बनल्यानंतर आयुष्यात काय बदल झालेत असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना अभिषेकने सांगीतले की, “या मध्ये एक गोष्ट नक्कीच बदलली आहे ती म्हणजे काही सीन करताना मला असहज वाटायला लागले आहे, मुलगी आराध्याला आवडणार नाहीत आणि ती मला प्रश्न विचारेल इथे नेमकं काय सुरु आहे.”

अभिषेक बच्चनने पुढे सांगीतले की तो दिग्दर्शक चित्रपट साईन करण्या अगोदरच इंटिमेट सीन करण्यास तयार नसल्याचे सांगतो, तुमच्याकडे इतर पर्याय उपलब्ध आहेत. अभिषेकने सांगीतले की त्याच्या या इंटिमेट सीन न करण्यामुळे त्याने अनेक चित्रपट देखील गमावले आहेत. तरी घेतलेल्या निर्णयाबद्दल कसलीही खंत वाटत नाही.  अभिषेक म्हणाला की अशा वेळी मी वेगळ्या पध्दतीने विचार करतो आणि दिग्दर्शक वेगळे विचार ठेवतात, मी त्यांच्या मतांचा पुर्णपणे आदर करतो. अभिषेक बच्चान याची वेब सीरीज 10 जूलै रोजी अमेझॉन प्राईम व्हिडीओ या माध्यमावर प्रदर्शित होणार आहे, या सीरीज मध्ये अभिषेक पुन्हा एकदा सिनीअर इंस्पेक्टर कबीर सावंत ही भूमिका करताना दिसणार आहे. त्याच्यासोबत नित्या मेनन आणि सयामी खेर देखील दिसणार आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT