Abhishek Bachchan google
मनोरंजन

अभिषेक बच्चन सिनेमात येण्याआधी तुटपूंज्या कमिशनसाठी करायचा 'हे' काम

आज ज्युनिअर बच्चनचा ४६ वा वाढदिवस आहे,त्यानिमित्तानं ही आठवण...

प्रणाली मोरे

अभिषेक बच्चन(Abhishek Bachchan) आज ४६ वर्षांचा झाला. त्यानिमित्तानं अनेक सेलिब्रिटींनी,त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आपल्या लाडक्या सुपुत्राला सोशल मीडियावरही वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी एक छान पोस्ट लिहिली आहे. अभिषेक बच्चन याला भले आपल्या आई-वडिलांइतकं यश सिनेइंडस्ट्रीत मिळालं नसलं तरी तो उत्तम अभिनेता हे नाकारता येणार नाही. अनेकदा त्याला वडिलांची नकल करायला जातो म्हणूनही दोष दिला गेलाय. पण त्याचे आताचे काही सिनेमे किंवा ओटीटी वरील काही वेबसिरीज पाहिल्या तर अभिनयात एक पाऊल पुढे गेलेला अभिषेक नक्कीच दिसेल. आजपर्यंत त्यानं किंवा बिग बींनी ही अनेकदा सांगितलं आहे की अभिषेकनं आई-वडिलांच्या नावाचा वापर करून बॉलीवूडमध्ये ना एन्ट्री केली ना कधी सिनेमे मिळवायचा प्रयत्न केला. असं असतं तर आजही तो सिनेमांसाठी स्ट्रगल करताना दिसला नसता.

तर आज ज्युनिअर बच्चनच्या वाढदिवसा निमित्तानं त्याच्याबद्दलची,त्यानं घेतलेल्या काही कष्टाची माहित नसलेली एक गोष्ट इथे मी सांगणार आहे. अभिषेक परदेशातून शिकून आलेला. सिनेमात यायचं तर होतं पण स्वतःच्या हिमतीवर. काही काम मिळत नाही तोपर्यंत त्यानं घरातील एका नातेवाईकांच्या एलआयसी संदर्भातील बिझनेसमध्ये नशीब आजमवायचा निर्णय घेतला,अन् सुरु झाला त्याचा पहिला स्ट्रगल. अभिषेक त्यावेळी चक्क एलआयसी एजंट म्हणून काम करायचा. त्याचा पगार हा कमिशनवर ठरलेला होता. पण कदाचित त्याच्या नशिबात स्ट्रगल करून का होईना अभिनेता होणंच लिहिलं होतं. म्हणूनच की काय एलआयसी एजंट म्हणून काम करताना त्याला फार यश मिळालं नाही. अन् तितक्यात त्याच्या वाट्याला त्याचा पहिला सिनेमा आला. आणि मग सुरू झाला ज्युनिअर बच्चनचा बॉलीवूड प्रवास. आज त्याच्या वाढदिवसा निमित्तानं त्याला खूप शुभेच्छा,

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT