abhishek cheating with anagha aai kuthe kay karte dohaljevan arundhati revels truth of abhi affair  sakal
मनोरंजन

Aai Kuthe Kay Karte: अनघाचं डोहाळजेवण-अभ्याचं लफडं.. आईचं करणार मुलाची भांडाफोड..

'आई कुठे काय करते' मालिकेत मोठा ट्विस्ट..

नीलेश अडसूळ

Aai kuthe kay karte update: 'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. रोज नवा ट्विस्ट नवं वळण ही मालिका घेत आहे. मध्यंतरी आप्पांची स्मृती गेल्यानंतर आता मालिकेत अनघाच्या डोहाळजेवणाचा घाट घातला आहे. पण हे डोहाळजेवण नीट पार पडेल तर ती मालिका कसली. या डोहाळजेवणात मोठा राडा होणार आहे. अभ्याचं लफडं आई स्वतः उघड करणार आहे.

(abhishek cheating with anagha aai kuthe kay karte dohaljevan arundhati revels truth of abhi affair )

'आई कुठे काय करते'ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत येणाऱ्या नव्या ट्विस्ट आणि वेगळ्या कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्यामूळे प्रेक्षकांचं भरपुर प्रेम या मालिकेला मिळतं. या मालिकेचं कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अरुंधती आणि आशुतोष यांच्या नात्यात वाढती जवळिक प्रेक्षंकाच्या पसंतीस पडत आहे. ते दोघ आपल्या प्रेमाची कबूली देणार तितक्यात अरुंधतीच्या समोर असं काही समोर येतं की ते पाहिल्यानंतर तिच्या पायाखालची जमीनच सरकते.

अरुंधतीला तिचा मुलागा अभिषेक एका दुसऱ्या मुलीसोबत दिसतो. अभिषेकने तिचा हात हातात घेतलेला असतो. तो तिला घेऊन बसला आहे. हे पाहिल्यानंतर अरुंधतीला चांगलाच धक्का बसतो. एकीकडे अनघा प्रेग्नेंट आहे तर दुसरीकडे अभिषेक दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यात आता अनघाचे डोहाळजेवण आहे, यावेळी काय राडा होणार लवकरच दिसेल..

अनघा लवकरच आई होणार असून देशमुख कुटुंबाने थाटामाटात अनघाचं डोहाळजेवण करायचं ठरवलं आहे. अनघाच्या डोहाळ जेवणाला सुद्धा संपूर्ण देशमुख कुटुंब एकत्र येऊन जल्लोष करणार आहे. एकीकडे आनंदाचं वातावरण असलं तरी या खास प्रसंगी अभिषेकचं एक खास गुपित संपूर्ण कुटुंबासमोर उघड होणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून अभिषेकचा बदलेलला स्वभाव अरुंधती आणि अनघासोबतच घरातील प्रत्येकालाच खटकतोय. अनघाच्या डोहाळ जेवणाला अभिषेकचं खरं रुप प्रेक्षकांसमोर येणार आहे.

नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये आई अभिला जाब विचारते.. काल तू कुठे होतास.. त्यावर अभि खोटं बोलतो.. त्यावर आई म्हणते.. 'तू मुंबईत होतास.. एका हॉटेलात..' त्यावर अनघा विचारते.. अभि.. तू कुणसोबत होता.. त्यावर अभि म्हणतो 'एका मुलीसोबत होतो'.. त्यावर आई त्याला खडसावते.. मग अभि म्हणतो माझ्याही काही गरजा आहेत. याचवेळी अनघा चक्कर येऊन पडते. आता घरात मोठा राडा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pahalgam Terrorist Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठा खुलासा; NIAने सांगितलं बैसरन खोऱ्यालाच का केलं गेलं लक्ष्य?

Ganpati Visarjan Tragedy: कोकणात गणपती विसर्जनावेळी तीनजण जगबुडी नदीत गेले वाहून, मात्र...

Mumbai News: आझाद मैदानासह परिसर मराठा आंदोलकांनी गजबजला, जरांगे यांची मुंबईच्या दिशेने आगेकूच

अल्पसंख्य सदस्यांना घरे रिकामी करण्याचे आदेश, वसईतील धोकादायक इमारतीप्रकरणी उच्च न्यायालयाची टिप्पणी

‘डीजेमुक्त सोलापूर’साठी शाळकरी मुली उतरल्या रस्त्यावर! अभ्यास, आरोग्य, पर्यावरणावर डीजेचा दुष्परिणाम, डीजेची दहशत थांबविण्याची मागणी

SCROLL FOR NEXT