actor ajay devgn spokesperson claimed actor beaten viral video fake 
मनोरंजन

अजय देवगणच्या मारहाणीचा व्हिडिओ 'खोटा'; सत्य आलं समोर 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिध्द अभिनेता अजय देवगणच्या बाबत एक वेगळाच किस्सा घडलाय. त्यामुळे तो चर्चेत आला आहे. गोष्ट तशी साधी नाही. तर चक्क त्याला मारहाण करण्यात आली असा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावरुन मोठ्या चर्चेला उधाण आले होते. आता त्याची सत्यता काय आहे याची माहिती अजय देवगणच्या एका प्रवक्त्यानं दिली आहे. त्यानं तो व्हिडिओ खोटा असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नेमका काय प्रकार झाला होता याची माहिती जाणून घेऊया. दरम्यानच्या काळात अजयला मारहाण करण्यात आली अशी माहीती ज्यावेळी सोशल मीडियावर प्रसिध्द झाली तेव्हा अजयच्या फॅन्सला मोठा धक्का बसला होता.

सध्या सोशल मीडियावर जो एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यात अजयला मारहाण केल्याचे दिसत आहे. मात्र त्या व्हिडिओची सत्यता समोर आली आहे. अजयच्या एका प्रवक्त्यानं त्याविषयी माहिती दिली आहे. अजय सध्या त्याच्या वेगवेगळ्या चित्रपटांच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. त्या दरम्यान एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे अजय भलताच चर्चेत आला आहे. अशाप्रकारे त्या व्हिडिओनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. खरा प्रकार काय आहे याची माहिती अजयच्या चाहत्यांना हवी आहे. त्यामुळे त्यांना नेमकं काय झाले हे समजेल.

त्या व्हिडिओमध्ये दाखविण्यात आल्यानुसार दिल्लीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास दोन गटांमध्ये हाणामारी झाली. त्यात अजय देवगणचेही नाव आहे. त्या व्हायरल व्हिडिओमध्ये असे सांगण्यात आले आहे की, त्यावेळी अजय हा नशेत होता. आणि त्यानं भांडण केलं. मारहाण केली. कार पार्किंगवरुन त्याचा कुणाशी वाद झाला. आणि गोष्ट भांडणापर्यत जाऊन पोहचली. एका युझर्सनं या घटनेचा पूर्ण व्हिडिओ तयार केला आहे. त्यात व्हाईट कलरचा ड्रेस घातलेल्या व्यक्तीला मारहाण होत असल्याचे दिसून आले आहे. व्हिडिओ पोस्ट करताना त्या व्यक्तीनं असं लिहिलं आहे की, मला माहिती नाही की त्या व्हिडिओमध्ये अजय देवगण आहे किंवा नाही, मात्र गेल्या काही दिवसांपासून लोकांमध्ये दिल्लीतील आंदोलनावरुन वाद सुरु आहे.

 कदाचित त्या वादाचा फटका अजयला बसला असे वाटत आहे. सोशल मीडियावर त्या वादाची मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली होती. त्यामुळे अनेकांना ती व्यक्ती अजय देवगण वाटत आहे. जेव्हा ही बातमी प्रसिध्द झाली तेव्हा अजयच्या प्रवक्त्यानं आपलं निवेदन प्रसिध्द केलं आहे. त्यानं म्हटलं आहे की, दिल्लीत जी घटना झाली त्या व्हिडिओमध्ये अजय देवगणची जी गोष्ट दाखवण्यात आली आहे ती चूकीची आहे. अजय पूर्णवेळ आपल्या मैदान आणि मे डे, गंगूबाई काठियावाडी चित्रपटाच्या शुटिंगसाठी मुंबईत होते. गेल्या वर्षभरापासून त्यांनी दिल्लीत पाऊल ठेवलेलं नाही. त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये अजय देवगण आहे असे म्हणणे चूकीचे आहे. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT