ajith kumar, ajith kumar news, ajith kumar movies, ajith kumar airport SAKAL
मनोरंजन

Ajith Kumar: १० महिन्यांच्या मुलीला घेऊन जात होती महिला.. साऊथस्टार अजितने केली 'अशी' गोष्ट की सर्वांचं मन जिंकलं

51 वर्षांच्या अजित आपल्या फिल्म्ससाठी नाही तर एक वेगळ्या कारणावरून चर्चा सुरु झालीय

Devendra Jadhav

Ajith Kumar News:तमिल स्टार अजित कुमारची तगड़ी फॅन फॉलोइंग आहे. अजित कुमारचा सिनेमा जेव्हा जेव्हा येतो तेव्हा त्यांच्या सिनेमाची चर्चा असते. 51 वर्षांच्या अजित आपल्या फिल्म्ससाठी नाही तर एक वेगळ्या कारणावरून चर्चा सुरु झालीय.

अजित कुमार यांनी १० महिन्याचं बाळ घेऊन प्रवास करणाऱ्या एका महिलेसाठी एक अशी गोष्ट केलीय ज्यामुळे त्यांचं सगळीकडे कौतुक होतं.

(Actor Ajith Kumar wins hearts while woman travelling with her baby Know Details What happened actually)

हेही वाचा: What is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

अजित यांचा लंडनमधील एक फोटो वायरल होत आहे, या फोटोत अजित एका महिलेसोबत दिसून येत आहेत. या महिलेच्या कडेवर एक मुलगा आहे आणि अजितने तिची बॅग पकडली आहे. आता सांगते आहे शेवटी ही छायाचित्रे कशामुळे फॅन्सची तारीफ मिळवत आहेत. अजित कुमार यांचा लंडनमधील एक फोटो व्हायरल झालाय.

सोशल मीडियावर त्या महिलेच्या नवऱ्याची पोस्ट व्हायरल होत आहे.. त्याने लिहिले आहे की, 'माझी पत्नी ग्लासगोहून चेन्नईला जात होती. ती 10 महिन्याच्या बाळासोबत एकटी होती. त्यांना अभिनेता अजित कुमार यांना भेटण्याची संधी मिळाली.

ती बाळाला आणि सामानाला घेऊन अजित यांना भेटायला गेली. त्यावेळी अजितने फोटो क्लिक करताना माझ्या पत्नीलाही मदत केली.

पुढे ते लिहितात, 'त्यांनी आमची सुटकेस पकडली. जेव्हा माझी पत्नी म्हणाली की राहूदे, तेव्हा अजित खूप प्रेमाने म्हणाला की.. तुम्ही संकोच बाळगू नका.. काहीही झाले तरी मी तुमची बॅग पकडतो. मलाही दोन मुले आहेत.

मी समजू शकतो ही अवस्था.. अजित केवळ चित्रपटांमध्येच नाही तर वास्तवातही एक नायक आहे, ज्याचे उदात्त मन स्पष्टपणे दिसून येते." अशा शब्दात त्या महिलेच्या नवऱ्याने अजितचे आभार मानले आहेत.

अभिनेता अजित कुमारचे वडील पी सुब्रमण्यम मणी यांचे शुक्रवारी त्यांच्या राहत्या घरी झोपेतच निधन झाले. पी सुब्रमण्यम दीर्घकाळापासून वृद्धापकाळाशी संबंधित आजाराने त्रस्त होते. ते ८५ वर्षांचे होते.

लोकांची गर्दी होऊ नये म्हणुन त्यांच्या निवासस्थानी अतिरिक्त सुरक्षेसाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले - अभिनेता अजित, अनिल आणि अनुप असा परिवार आहे.

अजित कुमार हा साऊथ सुपरस्टार असून त्याचे वल्लीमइ, थुनिवू, वेडालम असे सिनेमे सुपरहिट झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT