amitabh
amitabh 
मनोरंजन

लॉकडाऊमध्ये अमिताभ यांनी शेअर केला 'हा' व्हिडिओ, हसून हसून व्हाल लोटपोट

सकाळवृत्तसेवा

मुंबई- देशभरात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. परिस्थिती आणखी गंभीर होऊ नये यासाठी ३१ मे पर्यंत हा लॉकडाऊन आता वाढवण्यात आला आहे.त्यामुळे देशातील जनतेमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटीपर्यंत सगळेच घरात बसून आहेत त्यामुळे सगळ्यांच्या मनात निराशा आहे. अशांतच काही सेलिब्रिटी हे वातावरण हलकं करण्याासाठी आणि या विषयापासून तुमचं लक्ष हटवण्यासाठी सोशल साईटवर तुमचं मनोरंजन करण्याच्या प्रयत्न करत आहेत. या निराशाजनक वातावरणामुळे सगळेजण त्यांचं हसणंच विसरुन गेले आहेत आणि म्हणूनचं लॉकडाऊनच्या या वातावरणार बिग बी अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

बिग बी अमिताभ सोशल मिडियावर चांगलेच ऍक्टीव्ह असतात त्यांना आवडणारी सोशल मिडियावरची गोष्ट ते बिनधास्त शेअर करतात. असाच एक व्हिडिओ अमिताभ यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचं हसून हसून पोट दुखेल. बिग बींनी शेअर केलेला व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. अनेकजण यावर त्यांची प्रतिक्रिया देत आहेत.

या व्हिडिओमध्ये एक महिला तिच्या लहान मुलाला जेवण भरवताना पाहायला मिळतेय. यादरम्यान ती त्याच्यासमोर शिंकते. ते पाहून खुर्चीवर बसलेला हा छोटा मुलगा जोरजोरात हसायला लागतो. मुलाला एवढं जोरात हसताना पाहून त्याच्या आईला देखील राहवत नाही. त्याच्या हसण्याने ती स्वतःचं हसणं देखी आवरु शकत नाहीये. म्हणूनंच त्याला सारखं हसवण्यासाठी ती मुद्दाम शिंकत राहते आणि तो छोटा मुलगा जोरजोरात हसत राहतो.

बिग बींनी शेअर केलेला हा मजेशीर व्हिडिओ आत्तापर्यंत १२ लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना बिग बींनी कॅप्शन दिलंय, 'लहान मुलाचा व्हिडिओ.. सध्याच्या या निराशाजनक परिस्थितीत थोडासा बदल म्हणून हसा. '   

actor amitabh bachchan shares a funny video on instagram  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT