Actor and Model Milind Soman Shared Supportive tweet for Akshay Kumar
Actor and Model Milind Soman Shared Supportive tweet for Akshay Kumar esakal
मनोरंजन

भाऊ तू घाबरु नकोस,जे केलं ते बेस्टचं...मिलिंदनं केलं अक्षयचं कौतुक

सकाळ ऑनलाईन टीम

काही दिवसांपासून अक्षयच्या जाहिरातीचा विषय मीडियामधे जोर धरून बसलाय.अक्षय विमल पान मसालाच्या नवीन जाहिरातीत झळकला होता.या जाहिरातीत अक्षय कुमार,शाहरूख खान आणि अजय देवगण एकत्र दिसून येतात.(Vimal Pan Masala)त्यावरून अक्षयला ट्रोल करण्यात आले होते.अक्षयच्या मनावर याचा खोलवर परिणामही झाला होता.त्यानंतर त्याने सोशल मीडियावर एक मोठी घोषणा केली होती.(Ajay Devgan)ज्यामधे अक्षयने इंन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांची माफी मागितली आहे.तसेच यापुढे कुठल्याही तंबाखू ब्रँडची जाहिरीत करणार नाही असेही त्याने सांगितले.

अक्षय कुमारने ट्वीटरवरदेखील ट्वीट करत सगळ्यांची माफी मागितली आहे.याआधी मी अश्या कुठल्याच जाहिरातीत काम केले नाही.(Akshay Kumar)अनेक दिवसांपासून विमलच्या जाहिरातीवरून मला ट्रोल केल्या जात आहे.त्याचा खोलवर परिणाम माझ्यावर झालाय.या नंतर मी कधीही तंबाखूची जाहिरात करणार नाही.(Shahrukh Khan)तसेच मी माझ्या सगळ्या चाहत्यांची आणि शुभचिंतकांची माफी मागतो.या जाहिरातून मिळालेला पैसा मी चांगल्या कामी लावण्याचे ठरवले आहे.असे काहीसे त्याने ट्वीट करत चाहत्यांची माफी मागितली आहे.अक्षयला पद्मश्री सारखा मोठा मान मिळाला असताना त्याने तंबाखूची जाहिरात करणे अनपेक्षित आहे,असेही काहींचे म्हणने पडले होते.

आता प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणने अक्षय कुमारसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.'अक्षय तुझा निर्णय योग्यच आहे.मग कारण काहीही असो',असे ट्वीट करत मिलिंदने अक्षयला पाठिंबा दिला आहे.मिलिंदशिवाय इतरही काही सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अक्षय कुमारला त्याच्या जाहिरात वादात पाठिंबा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

SRH vs RR : आज पडणार धावांचा पाऊस! जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या राजस्थान रॉयल्सशी हैदराबादचा सामना

Latest Marathi News Live Update : अंधेरी पंप परिसरात मोठी आग, दारू दुकान जळून खाक

SCROLL FOR NEXT