anshula, janhvi, khushi , arjun, Boney Kapoor file image
मनोरंजन

'आम्ही अजूनही दोन वेगळे कुटुंबच'; सावत्र बहिणींबाबत अर्जुनचा खुलासा

श्रीदेवी यांच्या निधनानंतर अर्जुन-अंशुला हे बोनी कपूर यांच्या जवळ आले, पण..

प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (arjun kapoor) त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असतो. बोनी कपूर (Boney Kapoor) आणि त्यांची पहिली पत्नी मोना शौरी यांची अर्जुन आणि अंशुला (anshula) ही दोन मुलं आहेत. तर जान्हवी (janhvi) आणि खुशी (khushi) या दोघी बोनी कपूर आणि त्यांची दुसरी पत्नी व दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांच्या मुली आहेत. नुकतेच एका मुलाखतीमध्ये अर्जुनने त्याच्या सावत्र बहिणींसोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे. (actor arjun kapoor says him anshula janhvi khushi are not one unit we still are different families)

या मुलाखतीमध्ये अर्जुन म्हणाला, 'जर मी म्हणालो की आमचे कुटुंब परफेक्ट आहे, तर ते अयोग्य ठरेल. आमची मतं वेगळी आहेत, हे आमचे वेगळे राहण्याचे कारण नसून आम्ही अजूनही दोन वेगळे कुटुंब आहोत. हळूहळू आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही एकत्र खूप चांगला वेळ घालवतो. पण आम्ही अजूनही एकत्र कुटुंब म्हणून राहत नाही. मला सर्व काही ठीक आहे असे खोटे सांगायचे नाही. आम्ही अजूनही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही एकमेकांच्या आयुष्यातील पोकळी भरण्याचा प्रयत्न करत आहोत, एकमेकांना आधार देत आहोत. जान्हवीच्या जन्मानंतर 20 वर्षांनी आम्ही एकत्र भेटलो. मी आता 35 वर्षांचा आहे आणि अंशुला 28 वर्षांची आहे. आम्ही अजूनही एकमेकांचे वेगळेपण समजण्याचा प्रयत्न करत आहोत.'

काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर अर्जुनचा 'सरदार का ग्रँडसन' आणि 'संदीप और पिंकी फरार' हे चित्रपट प्रदर्शित झाले. लवकरच तो मोहित सूरी यांच्या 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटातही दिसणार आहे. ज्यात दिशा पटानी, तारा सुतारीया आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT