actor aroh welankar shared post for congratulate maharashtras new cm eknath shinde and deputy cm devendra fadanvis sakal
मनोरंजन

अडीच वर्षात झालेलं नुकसान.. एकनाथ शिंदेंना आरोह वेलणकरच्या खास शुभेच्छा..

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नीलेश अडसूळ

eknath shinde : महाराष्ट्रातल्या राजकीय गोंधळाला आता पूर्णविराम लागलाय असं म्हणायला हरकत नाही. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आणि महाराष्ट्रासाठी हा मोठा धक्काच ठरला. कारण गेली काही दिवस शिंदे यांचे बंड, गुवाहाटी दौरा या सगळ्याने मोठी राजकीय उलथपालथ निर्माण झाली. त्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईत आले. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे वाटत असतानाच एकनाथ शिंदे यांचं नाव घोषित झालं. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे अडीच वर्षे सुरू असलेले महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. अगदी कालच ३० जून रोजीच एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधीही झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेता आरोह वेलणकर (aroh welankar) यानेही खास शुभेच्छा शिंदेंना दिल्या आहेत. (actor aroh welankar shared post for congratulate maharashtras new cm eknath shinde and deputy cm devendra fadanvis)

अभिनेता आरोह वेलणकर हा कायमच भाजपला पाठिंबा देत आलेला आहे. त्याने अडीच वर्षात महाविकास आघाडीवर भरपूर टीका केली. तो त्याच्या ट्विटर अकाउंट वरून आपले विचार मांडत असतो. आजवर त्याने अनेक विषयांवर महाविकास आघाडीला धारेवर धरले आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच त्याने 'महाविकास आघाडीची वेळ संपत आलीय' अशी टीका त्याने केली होती. तर अडीच वर्षात महाविकास आघाडीतील दोन नेते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जातात हे किती दुर्दैवी आहे. अजूनही कारवाया सुरूच आहेत. महाविकास आघाडी सरकार हे भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारे आहे, असेही तो म्हणाला होता. याचाच संदर्भ देऊन त्याने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत.

'महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन. तुमच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र यशाचे शिखर गाठो. तसेच गेल्या अडीच वर्षात झालेले नुकसान भरून काढा. खूप साऱ्या शुभेच्छा आणि असेच पुढे जात राहा,' अशा सूचक शुभेच्छा आरोहने राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Deepotsav Controversy : ‘’दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत, हे दाखवण्यापर्यंत सरकार...’’ ; मनसेचा आरोप!

ZIM vs AFG : झिम्बाब्वेचा कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय! Blessing Muzarabani ने मोडला मोहम्मद सिराजचा विक्रम

Mehul Choksi: मेहुल चोक्सीला भारतात आणणार! मुंबईतील 'या' तुरूंगात होणार रवानगी, कशी असणार सुविधा?

Siddaramaiah Latest News : सिद्धरामय्या घेताय राजकारणातून निवृत्ती? ; मुलाच्या विधानाने कर्नाटकातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!

Latest Marathi News Live Update : युनिट-१ भाजी मार्केटमधील २० दुकानांना भीषण आग

SCROLL FOR NEXT