arun govil, ramayan, ramayan serial, ram navami 2023, ayodhya ram mandir SAKAL
मनोरंजन

Ram Navami 2023: तुला लाज नाही वाटत? जेव्हा श्रीराम साकारणाऱ्या अभिनेत्याला फॅनने झापलं होतं

अरुण गोविल रामायण मालिकेत भगवान श्रीरामाची भूमिका करून प्रसिद्ध झाले

Devendra Jadhav

Ram Navami 2023: आज रामनवमी. प्रभू श्रीरामाची आराधना करण्यासाठी आज अनेक भाविक भक्त अयोध्येला गेले आहेत. प्रभू श्रीरामाचे भारतातच नाही तर जगभरात लाखो भाविक भक्त आहेत.

रामनवमी निमित्ताने पटकन लक्षात येते ती म्हणजे रामानंद सागर (Ramanand Sagar) यांची रामायण (Ramayan) हि मालिका. हि मालिका सुरु झाल्यावर रस्त्यावर शुकशुकाट व्हायचा.

अभिनेते अरुण गोविल(Arun Govil) यांनी रामायण मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका साकारली होती. पण अरुण गोविल यांच्या आयुष्यात एक घटना अशी घडली होती कि त्यांना त्यांच्या फॅन्सचा ओरडा खावा लागला होता. काय होती ती घटना पाहूया..

( actor arun govil playing Shriram in ramayan serial was abused by a fan for 'this' reason)

2020 मध्ये द कपिल शर्मा शोमध्ये रामायण मालिकेची संपूर्ण कास्ट सहभागी होती. त्यावेळी अरुण यांनी हा किस्सा शेयर केला.

अरुण म्हणाले कि ही घटना एका तमिळ चित्रपटाच्या सेटवर घडली आहे. अरुण तामिळ सिनेमातील एका पौराणिक सिनेमात तिरुपती बालाजीची भूमिका साकारत आहेत. साऊथमध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरु होतं.

त्या दिवसांमध्ये अरुणला सिगारेट ओढायची सवय होती. त्यांना धूम्रपान करायची सवय अस्वस्थ करत असे. एके दिवशी दुपारच्या जेवणानंतर धुम्रपान करायची त्यांना तलब लागली म्हणून त्यांनी एका कोपऱ्यात सिगारेट पेटवली.

अरुण म्हणाले, “मी सेटवर पडद्याआड सिगारेट ओढत होतो, आणि तेवढ्यात एक गृहस्थ तिथे आला आणि त्याने माझ्याकडे एकटक पाहिलं.

तो त्याच्या भाषेत काय म्हणाला हे मला माहीत नव्हते, पण त्याच्या हावभावावरून मला समजले की तो फक्त मला शिवीगाळ करत होता आणि तो माझ्यावर खूप नाराज होता,”

त्या गृहस्थाची भाषा समजणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला बोलावून अरुणने त्याचा अर्थ समजावून घेतला, मग अरुणला कळलं "आम्ही तुम्हाला देव मानतो आणि तुम्ही इथे बसून सिगारेट ओढता." असं ती व्यक्ती त्यांना सांगत होती.

अरुणला त्यांची चूक लक्षात आली. त्या दिवसानंतर आजतागायत अरुण गोविल यांनी कधीही सिगारेट ओढली नाही.

अरुण गोविल यांनी दूरदर्शनच्या रामायण मालिकेत भगवान श्रीरामाची भूमिका करून ते घराघरात प्रसिद्ध झाले.

पहिला लॉकडाऊन लागू झाल्यानंतर 2020 मध्ये रामायण हि मालिका पुन्हा एकदा दूरदर्शनवर दाखवली गेली.

या मालिकेने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले. अगदी हॉलिवूडच्या गाजलेल्या गेम ऑफ थ्रोन्स मालिकेचा TRP रेकॉर्ड या मालिकेने मोडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

SCROLL FOR NEXT