dharmendra 
मनोरंजन

अभिनेते धर्मेंद्र यांचा आनंद गगनात मावेना, व्हिडिओ शेअर करत दिली आनंदाची बातमी..

सकाळवृत्तसेवा

मुंबई- बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र लॉकडाऊन दरम्यान त्यांच्या फार्महाऊसवर वेळ घालवत आहेत. फार्महाऊसवरचे अनेक फोटो आणि व्हिडिओ ते सोशल मिडीयावर शेअर करत असतात आणि चाहते देखील त्याला चांगला प्रतिसाद देताना दिसून येतात. नुकताच धर्मेंद्र यांनी एक व्हिडिओ त्यांच्या ट्वीटरवर पोस्ट केलाय. हा व्हिडिओ शेअर करताना ते चाहत्यांना एक खास आनंदाची बातमी सांगत आहेत.

धर्मेंद्र यांनी ट्वीटवर हा व्हिडिओ शेअर करत म्हटलंय, अभिनंदन, काल रात्री माझ्या साहीवाल गाईने एका गोंडस आणि तगड्या वासराला जन्म दिला आहे. मलाही जवळ येऊ देत नाहीये. प्रत्येक आई तिच्या नवजात बालकाच्या सुरक्षेच्या कारणाने काळजीत असते. मी या सुंदर लोकांसोबत इथे खुप आनंदी आहे. 

धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये गाय आणि वासरु दोघेही एकदम व्यवस्थित आणि ठणठणीत दिसून येत आहेत. तसंच धर्मेंद्र यांनी म्हटल्याप्रमाणे ते जेव्हा त्या नवजात वासराकडे जायचा प्रयत्न करत होते तेव्हा ती गाय इशारा करत त्यांना देखील येऊन देत नसल्याचं दिसतंय.

याआधी देखील धर्मेंद्र यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यात धर्मेंद्र यांनी लाकडी स्टोव्ह शेअर केला होता. त्याबद्दल लिहिताना ते म्हणाले होते, कोणीतरी प्रेमाने दिला आहे हा लाकडी स्टोव्ह. याच्यावर केलेल्या जेवणाचा एक वेगळाच स्वाद आहे. जे मी विसरलो होतो ते पुन्हा नशीबाने मिळालं. लॉकडाऊनमध्येही धर्मेंद्र त्यांच्याविषयीचे अपडेट्स शेअर करत चाहत्यांसोबत जोडले गेलेले आहेत. त्यांनी शेअर केलेले फार्महाऊसवरचे व्हिडिओ तर चाहत्यांना खूपंच भावतात. धर्मेंद्र यांचा असाही देसी अंदाज यानिमित्ताने पाहायला मिळतो.

actor dharmendra cow give birth to calf video viral on social media  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT