actor Dharmendra house after aamir khan three people of actor staff positive  
मनोरंजन

धर्मेंद्रच्या घरात पोहचला कोरोना, घरातले तिघेजण पॉझिटिव्ह 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडमध्ये कोरोनानं आता कहर केला आहे. एकापाठोपाठ वेगवेगळ्या कलाकारांना त्याची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी प्रसिध्द अभिनेता आमीर खान याला कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती त्याच्या प्रवक्त्यानं दिली होती. आमीर ज्या कार्यक्रमात होता त्याच कार्यक्रमात मुख्यमंत्री उध्दव ठाकरेही उपस्थित असल्यानं आता त्यांनाही क्वॉरनटाईन व्हावे लागणार असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपासून कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. यापूर्वी बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्यांना कोरोना झाला आहे. आता प्रख्यात अभिनेता धर्मेंद्र यांच्या घरात कोरोनानं शिरकाव केला असून त्यांच्या घरातील तिघेजण पॉझिटिव्ह असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गेल्या एक दोन आठवड्यांपूर्वी मनोज वाजपेयी, संजय लीला भन्साळी, रणबीर कपूर, सतीश कौशिक, यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

देशभरात कोरोनानं पुन्हा आपला फास आवळण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. बुधवारचा दिवस तर बॉलीवूडसाठी धोक्याचा ठरला आहे. आमीर खान, धर्मेंद यांच्या घरातील काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे सलमान खानलाही कोरोना झाला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्याच्या निकटवर्तीयांनी तसे काही नसल्याचे सांगितले आहे. आता समोर आलेल्या माहितीनुसार धर्मेंद्र यांच्या घरातील तीनजणांना कोरोना झाला आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देओल कुटूंबातील सर्व सदस्य आता पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यांनी काळजी घेण्यास सुरुवात केली आहे. परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी सध्या परिवारातील सर्व सदस्य आपआपल्या परीनं काळजी घेताना दिसत आहेत. कोरोनाची दुसरी लाट अनेकांसाठी धोकादायक ठरताना दिसत आहे. त्याचे कारण म्हणजे दिवसागणिक कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा बंदोबस्त करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असताना अद्याप त्याचा प्रभाव काही कमी झाला नसल्याचे दिसत आहे. 

देओल यांच्या घरी जे कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत ते लवकरच बरे होतील अशी प्रार्थना देओल यांनी केली आहे. यासगळ्यात धर्मेंद्र हे देखील काळजी घेत आहेत. आता त्यांच्या सर्व स्टाफला क्वॉरनटाईन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून धर्मेद्र हे आपल्या लोणावळ्यातील फार्म हाऊसमध्ये थांबले होते. आज ते मुंबईत आले.  याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, मी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. आणि मला बरे वाटत आहे. मी पण कोरोना चाचणी केली आहे त्याच्या रिपोर्टची वाट पाहत आहे. 


 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

"मी महाराष्ट्राची मुलगी" मराठी भाषा विवादावर शिल्पाने बोलणं टाळलं; "मला या वादावर.."

Ratnagiri : देव तारी त्याला कोण मारी! पुण्यातील पर्यटक समुद्रात वाहून जात होता..., स्थानिकांनी प्रसंगावधानामुळे वाचला; थरारक क्षण

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT