actor Prasad found hanging at his residence  
मनोरंजन

दाक्षिणात्य सिनेमातील खलनायक एनडी प्रसादची घरात गळफास घेऊन आत्महत्या

अनेक मल्याळम सिनेमातून एनडी प्रसादनं वेगवेगळ्या भूमिका वठवल्या होत्या.

प्रणाली मोरे

मॉलीवूड अभिनेता(Mollywood Actor) एनडी प्रसाद(ND Prasad),मल्याळम सिनेमात छोट्या-मोठ्या अनेक भूमिका करण्यासाठी ओळखला जायचा,त्यानं राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. रविवारी २६ जून रोजी सुमारे संध्याकाळी ७.३० च्या सुमारास त्यानं गळफास लावून घेतल्याचं तपासात समोर आलं आहे. त्याच्या घराच्या आवारात असलेल्या झाडाला त्यानं फास लावून घेतला. कोची शहरातील Kalamssery भागात त्याचं घर आहे. (actor Prasad found hanging at his residence)

एनडी प्रसाद हा ४३ वर्षांचा होता. प्रसादच्या पश्चात त्याची पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. पोलिसांनी प्राथमिक तपासात प्रसादच्या आत्महत्येच कारण हे मानसिक तणाव आणि कौटुंबिक कलह सांगितले आहेत.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार अभिनेत्याला याआधी अनेकवेळा पोलिसांनी वेगवेगळ्या कारणांसाठी अटक केली होती. ड्रग्ज केसमध्ये देखील पोलिसांनी त्याला जेरबंद केलं होतं. गेल्या वर्षी एर्नाकुलम येथून प्रसादला २.५ ग्रॅम हाशिश ऑइल, १५ ग्रॅम गांजा अशा विविध ड्रग्ज साठ्यांसोबत पकडलं होतं. प्रसाद विरोधात अनेक पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या केसेस सध्या सुरु आहेत,ज्यांचा तपास अद्यापही सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT