actor sangram samel play lead role in Yog Yogeshwar Jay Shankar serial on colors marathi  sakal
मनोरंजन

Sangram Samel: प्रतीक्षा संपली! या दिवशी होणार शंकर महाराजांचं दिव्य दर्शन.. हा अभिनेता..

''योग योगेश्वर जय शंकर'' मालिकेत मोठा ट्विस्ट..

नीलेश अडसूळ

Yog Yogeshwar Jay Shankar: सध्या मालिका विश्वात पौराणिक मालिकांचे सत्र जोरदार सुरू आहे. प्रत्येक वाहिनीवर किमान एक तरी पौराणिक चारित्रावर आधारित मालिका सुरू आहे. यामध्ये कलर्स मराठी सर्वात पुढे आहे.

या वाहिनीवर स्वामी समर्थ, बाळूमामा आणि शंकर महाराज अशा तीन महापुरुषांची चरित्रे सुरू आहेत. यापैकी 'योगयोगेश्वर जय शंकर' या मालिकेत मोठा ट्विट येणार आहे. ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर जवळ आला आहे.

(actor sangram samel play lead role in Yog Yogeshwar Jay Shankar serial on colors marathi )

या मालिकेत शंकर महाराजांची चरित्रगाथा सांगण्यात आली आहे. ही मालिका सध्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरली असून एक रंजक आणि महत्वाचा टप्पा जवळ आला आहे.

आजवर या मालिकेत शंकर महाराजांच्या बाल लीला पाहिल्या पण शंकर महाराजांचे मूळ स्वरूप कधी दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर तो क्षण जवळ आला असून लवकरच शंकर महाराज आपल्या समोर प्रकाटणार आहेत.

हेही वाचा : गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यात बालशंकर दत्तगुरूंच्या आदेशावरून एका गुहेत ध्यानासाठी जाताना दाखवण्यात आले आहे. तो अनेक वर्ष अनुष्ठान करून आता सर्व सिद्धी प्राप्त करून शंकर महाराज अवतरणार आहेत.

येत्या 19 जानेवारीला हा भाग प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे शंकर महाराजांच्या भूमिकेत अभिनेता संग्राम समेळ झळकणार आहे.

ही भूमिका मालिकेचा निर्माता आणि अभिनेता चिन्मय उदगीरकर साकारणार अशी चर्चा होती, पण आता यात बदल झाला असून संग्राम ही भूमिका साकारणार आहे.

संग्राम यापूर्वी 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे चिरंजीव राजाराम राजेंच्या भूमिकेत दिसला होता.

तर 'ललित 205' या मालिकेतही तो महत्वाच्या भूमिकेत होता. 'स्वीटी सातारकर', 'विक्की वेलिंगकर' यांसारख्या चित्रपटातही त्याने भूमिका केल्या आहे. त्याचं 'एकच प्याला' हे नाटक विशेष गाजलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India flight malfunction : 'एअर इंडिया'च्या विमानात बिघाड; सणासाठी निघालेले २५५ भारतीय अडकले परदेशात!

AUS vs IND: ऑस्ट्रेलियाचा प्लॅन झाला! भारताचा सामना करण्यासाठी पहिल्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन नव्या खेळाडूंना संधी

Boat Capsizes: दुर्दैवी! १४ भारतीय नागरिकांना घेऊन जाणारी बोट उलटली, ३ जणांचा मृत्यू, तर...; घटनेनं हळहळ

Chhagan Bhujbal: काल 'ओबीसी'च्या मंचावर, आज नाराजीचा सूर! वडेट्टीवारांच्या व्हिडीओवरुन भुजबळांना सुनावले खडेबोल

Barshi Crime : "संबंध ठेवले नाही तर गुन्हा दाखल करीन"; विवाहित शेतकऱ्याला ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर अखेर गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT