ACTOR SURIYA
ACTOR SURIYA  esakal
मनोरंजन

फॅनच्या मृत्यूमुळे हेलावला सुपरस्टार सूर्या, कुटूंबियांच्या मदतीसाठी पोहचला घरी

धनश्री ओतारी

मागच्या काही दिवसांपासून दाक्षिणात्य अभिनेता सूर्या चांगलाच चर्चेत आला आहे. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. चित्रपटांप्रमाणेच तो हिरो बनून लोकांना मदत करतो. तसे, खऱ्या जीवनातही तो सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. याचा प्रत्यय नुकताचं आला आहे. त्याच्या एका चाहत्याचा अपघातात मृत्यू झाल्याची माहिती मिळताच तो थेट त्याच्या घरी पोहचला आहे. त्याच्या कुटूंबाची भेट घेत त्यांचे सात्वंन केलं.

सुर्याच्या या चाहत्याने नाव जगदीश आहे. त्याचा रोड अपघातात मृत्यू झाला. तो नामक्कलमध्ये सुर्याच्या फॅन क्लबचा सेक्रेटरी होता. जगदीशचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच सुर्या थेट चाहत्याच्या घरी पोहचला. त्याच्या कुटूंबाची भेट घेत त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे त्याने म्हटलं आहे. तसेच त्याने यावेळी त्याच्या कुटूंबाला अर्थिक मदतीचे आश्वासनदेखील दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुर्याने जगदीशच्या पत्नीला नोकरी आणि मुलीच्या शिक्षणाचा खर्च देणार असल्याचे म्हटले आहे. मागितला. सुर्याच्या या दौऱ्याचा फोटो त्याच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिनेता जगदीशच्या फोटोला पुष्प अर्पण करताना दिसत आहे.

सुर्या शेवटची तमिळ ग्रामीण अॅक्शन-ड्रामा फिल्म एथरक्कुम थुनिंधवनमध्ये दिसली होती. आता तो चित्रपट निर्माता बालासोबत त्याच्या नवीन प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.

मात्र दोन दशकांनंतर या दोघांचे पुनराआगमन होणार आहे. बाला आणि सुरिया यांनी 2003 मध्ये तामिळ चित्रपट पिथामगनमध्ये शेवटचे काम केले होते. याशिवाय सुर्याने निर्माता म्हणूनही बॉलिवूडमध्ये प्रवेश केला आहे. अभिनेत्याची निर्मिती कंपनी 2डी एंटरटेनमेंट त्याच्याच 'सूरराई पोत्रू' या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवणार आहे. ज्यामध्ये अक्षय कुमार मुख्य भूमिकेत असेल.

हा चित्रपट कॅप्टन जीआर गोपीनाथ यांच्या जीवनावर आधारित आहे. ते एअर डेक्कनचे संस्थापक आहेत. यामध्ये राधिका मदन, परेश रावल आणि महेश बाबू देखील दिसणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT