Actor Vin Diesel  Esakal
मनोरंजन

हॉलिवूड स्टार विन डीजलवर लैंगिक छळाचा आरोप! काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता विन डीजल हा चर्चेत आला आहे.

Vaishali Patil

Vin Diesel Sexual Assault Case: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता विन डीजल (Vin Diesel) हा नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. त्याचे चित्रपट प्रेक्षकांना खुप आवडता. केवळ हॉलिवूडच नाही तर त्याचे चाहते जगभर पसरलेले आहेत.

'फास्ट अँड फ्युरियस' आणि 'ट्रिपल एक्स' सारख्या दमादर चित्रपटानंतर त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली मात्र, आता त्याच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. डीजलच्या एक्स असिस्टंटने त्याच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एस्टा जोनासनने ( Asta Jonasson) विन डीजलविरोधात काल लॉस एंजेलिसमध्ये खटला दाखल केला आहे ज्यामध्ये 2010 मध्ये 'फास्ट फाइव्ह'च्या शूटिंगदरम्यान विन डीजलने तिचा लैंगिक छळ केल्याचा आरोप एस्टाने केला आहे.

विनने अटलांटा हॉटेलच्या खोलीत तिच्यावर जबरदस्ती केली. बळजबरी करत त्याने तिचा विनयभंग केल्याचं तिने या आरोपात म्हटंल आहे. जर एस्टाने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला तर विन तिला नोकरीवरुन काढून टाकेल अशी धमकी विनने एस्टा जोनासनला दिल्याचं तिने सांगितले आहे.

घटनेच्या काही तासानंतर, तिला तिच्या वन रेस प्रॉडक्शनच्या चेअरपर्सन असलेल्या विनच्या बहीणीने तिला नोकरीवरून काढून टाकल्याचा आरोपही एस्टा जोनासनने केला आहे.

खटल्यात म्हटले तिने म्हटले की जगातील सर्वात जास्त कमाई करणार्‍या अभिनेत्यांविरुद्ध बोलण्यास ती घाबरत होती, तिला बॉयकॉट केले जाईल अशी भिती तिला वाटत होती म्हणुन ती वर्षानुवर्षे शांत राहिली.

महिलेने विन आणि त्याच्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिच्या वकिलाने सांगितले की त्याच्या क्लायंटच्या खटल्यात विनवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

विन डिझेल बद्दल बोलायचे झाले तर त्याचा 'फास्ट एक्स' गो शेवटता ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये विनची गणना होते.

2017 मध्ये, फोर्ब्समध्ये विनचा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता म्हणुन उल्लेख होता. तो शेवटचा 'फास्ट एक्स' चित्रपटात दिसला होता. दीपिका पदुकोणने विनच्या ट्रिपल एक्स या चित्रपटातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT