The actors says it would be wrong to stop filming 
मनोरंजन

चित्रिकरणं बद करणं योग्य ठरणार नाही; कलाकारांनी व्यक्त केलं मत

सकाळवृत्तसेवा

मुंबई : सध्या कोरोनाचा कहर झाला आहे. सगळीकडे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारने काही नियम व अटींनुसार चित्रीकरणाला परवानगी दिली आहे. चित्रीकरण हळूहळू सुरू झाले असले, तरी काही मालिकांच्या सेटवर कोरोना पाॅझिटिव्ह झालेली मंडळी आढळत आहेत. काही कलाकारांनीदेखील कोरोना झाला. आता एका अभिनेत्रीचे निधन झाले. त्यामुळे महिनाभरचित्रीकरण बंद ठेवावे, अशी चर्चा सुरू झाली आहे. पण चित्रीकरण बंद करू नये, असा सूर कलाक्षेत्रातून उमटत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

''चित्रीकरण महिनाभर बंद ठेवणे हा काही पर्याय होऊ शकत नाही. कारण पडद्यामागे
काम करणाऱ्या तंत्रज्ञ व कामगार यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे. अगोरदरच पाचेक महिने चित्रीकरण बंद होते. त्यामुळे कामगारांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. कित्येक जण रोजगाराला मुकलेले आहेत. अशा वेळी चित्रीकरण बंद करू नये असे मला वाटते. चित्रीकरण स्थळी योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. काही मंडळींनी कर्ज काढलेले आहे. त्यामुळे काम सुरू ठेवणे आवश्यक आहे. आता आणखीन सुविधा वाढविल्या पाहिजेत आणि आरोग्याची काटेकोर काळजी घेणे आवश्यक आहे.''
किशोरी शहाणे, अभिनेत्री

''कोरोना कधी जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे चित्रीकरण थांबविणे योग्य नाही. सुबोध भावे आणि अन्य मंडळीमुळे गेले पाचेक महिने बंद असलेली चित्रपटसृष्टी सुरू झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी अधिक घेतली पाहिजे. विशेष म्हणजे वयस्कर कलाकारांची काळजी संपूर्ण युनिटने घेतली पाहिजे तसेच त्या त्या कलाकारांनीदेखील आपली काळजी स्वतः घेणे आवश्यक आहे.''
- आदिती सारंगधर (अभिनेत्री)

ऑनलाइन शाळेसाठी पालक आग्रही; मात्र शाळांचा नकार

मी नुकतीच आयपीएलची एक जाहिरात केली आणि त्यांनी आमची खूप काळजी घेतली. आम्हाला वेगळे रुम्स, पीपीई किट घातलेले मेकअपमन वगैरे. संपूर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यामुळे सरकारचे  नियम कडक पाळले पाहिजेत आणि चित्रीकरण केले पाहिजे. विशेष म्हणजे ज्येष्ठ कलाकारांनी खूप काळजी घेतली पाहिजे. आताच कुठे हळूहळू चित्रीकरण सुरू झाले आहे. काही मंडळींना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे चित्रीकरण बंद करणे चुकीचे आहे. मात्र आता काही जण असे म्हणत आहेत की हे सुरू केले पाहिजे व तेदेखील सुरू केले पाहिजे. परंतु आता काही सुरू करण्याऐवजी जे सुरू आहे त्याबाबत अधिक काळजी घेणे आणि सरकारी नियम पाळणे आवश्यक आहे.
- जयवंत वाडकर , अभिनेता 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT