actress akshaya naik shared emotional post for sameer paranjape birthday abhya latika sundara manamadhe bharali  sakal
मनोरंजन

Akshaya Naik: मालिका सोडली तरी प्रेम कायम.. अभ्याच्या वाढदिवशी लतिकाची खास पोस्ट..

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील अभ्या म्हणजेच अभिनेता समीर परांजपेचा आज वाढदिवस, लतिकाची पोस्ट भाव खाऊन गेली..

सकाळ डिजिटल टीम

Akshaya Naik : कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' (Sundara Manamadhe Bharli) या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेतील अभ्या आणि लतिका ही जोडी घराघरातच नव्हे तर मनामनात पोहोचली. मात्र काही दिवसांपूर्वी अभ्याचं निधन झाल्याचं दाखवत ते पात्र मालिकेतून वगळण्यात आले. समीर मालिकेतून बाहेर पडला असला तरी अभ्या आणि लतिका म्हणजे समीर आणि अक्षया नाईक यांचे नाते अजूनही तितकेच घट्ट आहे. आज समीरचा वाढदिवस, त्या निमित्ताने समीरसाठी अक्षयाने एक भन्नाट पोस्ट शेयर केली आहे.

(actress akshaya naik shared emotional post for sameer paranjape birthday abhya latika sundara manamadhe bharali )

अक्षयाने या पोस्ट मध्ये लिहिले आहे की , 'माझी सर्वात लाडकी नावडती व्यक्ती… तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला तोंडावर महत्त्व द्यायला मला आवडत नाही. पण माझ्यासाठी तू खूप महत्त्वाचा आहेस. तू जितका माझा अपमान करतोस तितका मी इतर कोणालाही करू देत नाही.'

अक्षयाने पुढे म्हणते, 'ते कौशल्य तुझ्याइतकं दुसरं कोणाला जमत नाही. माझा ग्लास आणि माझा हिरो कधीच विसरणार नाही. वाढदिवसाचं गिफ्ट पोहोचलं आहे, पार्टीची वसुली लवकरच करेन.' अशी पोस्ट अक्षयाने समीरसाठी केली आहे. सोबतच अक्षयाने दोघांचे काही खास फोटोज शेयर केले आहेत. अक्षयाच्या या पोस्ट मुळे 'अभ्या-लतिका'च्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. त्यांनी पुन्हा एकत्र यावं अशी मागणी चाहत्यांकडून होत आहे.

अक्षयाच्या या पोस्टवर समीरनेही कमेंट केली आहे, 'हाहाहा...टुडे...खूप प्रेम...भेट लवकर...पार्टी तो बनती है...लय गोड लिहिलं आहेस टुडे'. विशेष म्हणजे अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी या पोस्टवर समीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये दुष्काळाचं सावट; दर मिळत नसल्याने शेतकऱ्याने दोन एकर केळीची बाग केली उद्ध्वस्त

Babar Azam : बाबर आझम पुन्हा स्वस्तात बाद, बाऊंड्रीवरच चाहत्यांनी त्याला घेरले, सपोर्ट स्टाफ पळत आला अन्... Video Viral

SCROLL FOR NEXT