actress amrita Singh dressed Sara ali khan for father saif ali khan second marriage with Karena Kapoor 
मनोरंजन

सैफच्या दुसऱ्या लग्नासाठी अमृतानेच केला मुलीचा 'मेकअप'; तिचा ड्रेस सर्वांचा चर्चेचा विषय

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - बॉलीवूडमध्ये काहीही होऊ शकतं. आपल्या वयापेक्षा दुप्पट, असणा-या अभिनेत्री, अभिनेत्याशी लग्न करणं या क्षेत्रात गैर नाही. याऊलट जास्त काळ लग्नं, संसार टिकणे येथे गैर मानले जाते. असा समज होण्यासारख्या अनेक गोष्टी यापूर्वी घडल्या आहेत. बॉलीवूडमधला स्टार अभिनेता सैफ अली खान यानं 1991 मध्ये अमृता सिंगशी लग्न केले होते. अर्थात त्याचा हा निर्णय घरातल्या कुणालाही आवडला नव्हता. सगळे त्याच्या विरोधात होते. मात्र सैफ त्याच्या निर्णयावर ठाम  होता. 21 वर्षांच्या सैफनं आपल्यापेक्षा 13 वर्ष मोठ्या असणा-या सैफशी लग्न केले होते.

सैफ आणि अमृता यांना दोन मुलं झाली. एक सारा अली खान आणि दुसरा इब्राहिम मात्र 13 वर्षानंतर 2004 मध्ये अमृता आणि सैफ अली खान विभक्त झाले. दरम्यानच्या काळात त्यांच्यातील संघर्ष वाढत गेल्यानं त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून अमृता ही एकटी राहत आहे. दुसरीकडे सैफनं दुसरा जोडीदार शोधला होता. त्यानं करिना कपूरशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. 2012 मध्ये त्यांनी लग्नं केलं. याप्रसंगी मात्र अमृतानं मोठ्या धीरानं यासगळ्या प्रकरणाकडे पाहिले. ती कुणाला काही करण्याच्या भानगडीत पडली नाही. मीडियापासून चार हात लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. अशावेळी अमृताची मुलगी सारा अली खान हिनं आपल्या वडिलांचा मेक अप केला होता. ही आश्चर्याची बाब म्हणावी लागेल.

सैफ अली खानच्या दुस-या लग्नात त्याची मुलगी सारा अली खाननं त्याचा मेक अप केला होता.  अमृताला जेव्हा सैफच्या दुस-या लग्नाची बातमी कळली तेव्हा तिनं सर्वात प्रथम डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसलाला फोन केला होता. एका मुलाखतीत सारानं सांगितले होते की अमृतानं डिझायनरला फोन केला होता. त्यावेळी तिला समजले की, सैफ दुसरं लग्न करतो आहे. त्यावेळी मी ही चांगली वेशभूषा करुन जावं असे आईचे म्हणणे होते. वास्तविक सैफच्या लग्नाच्यावेळी साराच्या ड्रेसची खूप वाहवा झाली होती. तिनं अनारकली सूट, हि-याचा नेकलेस, ईयररिंग्स घातले होते. त्यावेळी सोशल मीडियावरही साराचे फोटो भलतेच हिट झाले होते.

नेटक-यांनी अमृताचंही कौतूक केलं होतं. ते म्हणाले होते की, आपल्या पतीच्या दुस-या लग्नात आईने मुलांना पाठवणे धाडसाचे म्हटले पाहिजे. मात्र यावेळी अमृतानं कुठलेही आढेवेढे न घेता ती सहजपणे त्या लग्नाला साराला पाठवायला तयार झाली होती. एवढेच नव्हे तर तिनं साराची वेशभूषाही केली होती. सारा आणि करिना कपूर यांच्यात चांगले संबंध आहेत. एका प्रश्नाला उत्तर देताना सारानं सांगतिले होते की, आमचे संबंध एकदम स्पष्ट आहेत. त्यात कुठलाही आडपडदा नाही. करिना मला म्हटली की तुझ्याजवळ ग्रेट मदर आहे. यापेक्षा मला आणखी काय हवं आहे. ती मला मैत्रिणीसारखी आहे. 4 वर्षांच्या तैमूरची आई असणारी करिना आता पुन्हा आई होण्याच्या चर्चेत आहे. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पुन्हा मुर्खपणा! ICC च्या ई मेलला अर्धवट उत्तर अन् विचारला उलट प्रश्न...

Banana Buns for Evening Snacks: संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट! घरच्या घरीच बनवा बनाना बन्स

Uttar Pradesh : विश्वकर्मा योजनेत समाविष्ट झाले १२ नवीन ट्रेड्स, CM योगी म्हणाले UP आता विकासाचे ग्रोथ इंजिन होणार

‘या अली’ गाण्याचे गायक जुबिन गर्गचं निधन, सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंगदरम्यान मृत्यू, संगीतविश्वाला मोठा धक्का!

Latest Marathi News Updates : राजापूर येथे बस थांबवून विद्यार्थांचं आंदोलन

SCROLL FOR NEXT